काश्मीरप्रश्नी पाकची पुन्हा गरळ
By admin | Published: October 27, 2014 01:50 AM2014-10-27T01:50:23+5:302014-10-27T01:50:23+5:30
काश्मीर प्रश्न भारत स्वत:च्या पद्धतीने सोडवू पाहत असून, आम्ही ते होऊ देणार नाही, आम्ही देशोदेशी दूत पाठवणार असून
इस्लामाबाद : काश्मीर प्रश्न भारत स्वत:च्या पद्धतीने सोडवू पाहत असून, आम्ही ते होऊ देणार नाही, आम्ही देशोदेशी दूत पाठवणार असून, एलओसीवर भारत करीत असलेल्या हिंसाचाराची, भारताच्या आक्रमकतेची माहिती आम्ही विविध देशांना देऊ, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे.
काश्मीर समस्या स्वत:च्या पद्धतीने सोडविण्याची भारताची इच्छा आहे, आम्ही ती इच्छा पूर्ण होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवू इच्छित आहे, ही पाकिस्तानची दुर्बलता असल्याचा गैरसमज कोणी करून घेऊ नये, आम्ही काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडू, असे ते म्हणाले. भारत सीमा नियंत्रण रेषेवरील शांततेचा भंग करीत असून, आम्ही त्याला फक्त प्रतिसाद देत आहे, असा कांगावाही त्यांनी केला. पाक सरकार यासंदर्भात आपले दूत व पथके विविध देशांना पाठवणार आहे. (वृत्तसंस्था)