Kathua Rape Case : हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसनं व्यक्त केला संताप आणि म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 13:24 IST2018-05-05T13:24:37+5:302018-05-05T13:24:37+5:30
कथुआ सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणाविरोधातील संतापाची लाट आता केवळ देशातच नाही तर परदेशातही पसरली आहे.

Kathua Rape Case : हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसनं व्यक्त केला संताप आणि म्हणाली...
नवी दिल्ली - कथुआ सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणाविरोधातील संतापाची लाट आता केवळ देशातच नाही तर परदेशातही पसरली आहे. बॉलिवूडसहीत हॉलिवूडमधील कलाकारही आपला राग व्यक्त करत आहेत. 'हॅरी पॉटर' फेम हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसननं याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.
कथुआ बलात्कार-हत्या प्रकरणी पीडितेचा खटला लढणाऱ्या वकील दीपिका सिंह राजावतचं एमानं कौतुक करत त्यांचं समर्थन केले आहे. ''दीपिका सिंह राजावत यांच्या धाडसाचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. दीपिका सिंह राजावत तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली आहात'', असं म्हणत एमाने दीपिका यांचा एक फोटो ट्विट केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ज्या फोटोमुळे दीपिका चर्चेत आल्या होत्या, तोच फोटो एका वृत्तासहीत पोस्ट करत एमानं दीपिका यांचं कौतुक केले आहे.
All power to Deepika Singh Rajawat ✊🏻https://t.co/sZzDVcIFNo
— Emma Watson (@EmmaWatson) May 3, 2018