‘कीम यांना १०० वर्षे जगायचे होते’
By admin | Published: October 21, 2014 03:11 AM2014-10-21T03:11:00+5:302014-10-21T03:11:00+5:30
उत्तर कोरियाचे संस्थापक कीम द्वितीय सुंग हे वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत जगू इच्छित होते, असे त्यांच्या माजी चिकित्सक किम सो योन यांनी सांगितले.
Next
हाँगकाँग : उत्तर कोरियाचे संस्थापक कीम द्वितीय सुंग हे वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत जगू इच्छित होते, असे त्यांच्या माजी चिकित्सक किम सो योन यांनी सांगितले. कीम यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.
मला १०० वर्षे जगण्यास मदत होऊ शकेल, असे उपचार शोधून काढा, असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले होते. कीम यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी किम सो योन यांनी एका केंद्रात संशोधनही सुरू केले होते. कीम यांना शक्य तेवढे दिवस राज्य करायचे होते, असे सीएनएनच्या एका वृत्तात म्हटले आहे. कीम यांची दीर्घकाळ जगण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी उपचारांची जंत्रीच तयार करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)