पोलिसांनी जमीन खणली, एक एक करत 73 मृतदेह आढळले; नेमकं काय झालं? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:05 IST2023-04-25T17:04:13+5:302023-04-25T17:05:51+5:30
अंधश्रद्धेपोटी 73 जणांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी जमीन खणली, एक एक करत 73 मृतदेह आढळले; नेमकं काय झालं? जाणून घ्या...
Kenya News: आफ्रिकन देश केनियामधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना जमिनीखाली आतापर्यंत 73 जणांचे मृतदेह आढळले आहेत. एका पादरीच्या सांगण्यावरुन त्याच्या अनुयायांना अमरण उपोषण केले, यात त्यांचा मृत्यू झाला. अमरण उपोषण करण्यामागे एक धक्कादायक कारण समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पादरी पॉल मॅकेंझी याने त्याच्या उपोषण केल्यावर येशू ख्रिस्त भेटतो असे त्याच्या अनुयायांना सांगितले. त्याच्या सांगण्यावरुन अनेक अनुयायांनी उपोषण सुरू केले. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पादरीला 14 एप्रिल रोजीच अटक केली आहे. मालिंदीच्या किल्फी प्रांतामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
सध्या आरोपी पादरीच्या मालकीच्या जमिनीत खोदकाम सुरू आहे. अनेक कबरी खणल्या जात आहेत. आतापर्यंत 73 जणांचे मृतदेह सापडले असून, आणखी लोकांचे मृतदेह सापडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी लोकांना या परिसरात अनेक कबरी आढळून आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.