तीन वर्षांपासून काढत होता लॉटरीचं तिकीट; भारतीय व्यक्ती यूएईत जिंकला तब्बल ४० कोटींचा जॅकपॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 10:39 PM2021-07-04T22:39:54+5:302021-07-04T22:43:07+5:30

मूळचा केरळचा असलेल्या व्यक्तीचं नशीब फळफळलं

Kerala Man Living In UAE Wins Rs 40 Crore Jackpot | तीन वर्षांपासून काढत होता लॉटरीचं तिकीट; भारतीय व्यक्ती यूएईत जिंकला तब्बल ४० कोटींचा जॅकपॉट

तीन वर्षांपासून काढत होता लॉटरीचं तिकीट; भारतीय व्यक्ती यूएईत जिंकला तब्बल ४० कोटींचा जॅकपॉट

Next

संयुक्त अरब अमिरातमध्ये ३७ वर्षांची भारतीय वंशाच्या व्यक्तीनं दोन कोटी दिरहमची (जवळपास ४० कोटी रुपये) लॉटरी जिंकली आहे. या बक्षीसात एकूण १० जणांचा वाटा असून इतर ९ जण विविध देशांमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती त्यानं दिली.

मूळचे केरळचे रहिवासी असलेल्या रंजीत सोमराजन यांना ४० कोटी रुपयांची लॉटरी लागली. सोमराजन अबूधाबीमध्ये चालक म्हणून काम करतात. गेल्या ३ वर्षांपासून ते लॉटरीची तिकिटं खरेदी करत होते. अखेर त्यांचं नशीब उघडलं आणि त्यांना जॅकपॉट लागला. खलीज टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं.

जॅकपॉट लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. दुसरा किंवा तिसरा क्रमांक येईल अशी मला आशा होती, असं सोमराजन यांनी सांगितलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस अनुक्रमे ३० लाख दिरहम आणि १० लाख दिरहम होती. 

'मी २००८ पासून अबूधाबीत आहे. दुबई टॅक्सी आणि विविध कंपन्यांमध्ये मी चालक म्हणून काम केलं आहे. गेल्या वर्षभरापासून एका कंपनीत ड्रायव्हर-कम-सेल्समन म्हणून मी कार्यरत आहे. पगार कपातीमुळे आयुष्यातील समस्या वाढल्या. मात्र आता जॅकपॉट जिंकल्यानं आनंदी आहे,' असं सोमराजन यांनी सांगितलं.

Web Title: Kerala Man Living In UAE Wins Rs 40 Crore Jackpot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.