खलिस्तानची निर्मिती ट्रुडोंमुळेच; कॅनडाच्या शीख नेत्याने पंतप्रधानांचा पर्दाफाश केला, आरोप केले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 02:43 PM2024-11-04T14:43:28+5:302024-11-04T14:44:42+5:30

कॅनडातील माजी खासदार उज्ज्वल दोसांझ म्हणाले की, बहुसंख्य शीख लोकसंख्या शांतताप्रिय आहे आणि त्यांचा खलिस्तानसारख्या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही.

Khalistan was created because of Trudeau Canadian Sikh leader exposes PM, alleges | खलिस्तानची निर्मिती ट्रुडोंमुळेच; कॅनडाच्या शीख नेत्याने पंतप्रधानांचा पर्दाफाश केला, आरोप केले

खलिस्तानची निर्मिती ट्रुडोंमुळेच; कॅनडाच्या शीख नेत्याने पंतप्रधानांचा पर्दाफाश केला, आरोप केले

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे त्यांच्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कार्यरत असलेल्या कट्टरपंथी खलिस्तानी घटकांचा बचाव करत आहेत. एवढेच नाही तर खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोपही ट्रुडो यांनी भारतावर केला असून त्यामुळे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, कॅनडातच जस्टिन ट्रुडो यांना विरोध होत असून लोक त्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. कॅनडातील व्हँकुव्हर येथे राहणारे शीख नेते उज्ज्वल दोसांझ यांनी तर जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे. ट्रुडो हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मूर्ख आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

खालिस्तानवाद्यांचा मंदिर परिसरात घुसून हिंदूंवर हल्ला, कॅनाडाचे खासदार भडकले; म्हणाले...

'बहुसंख्य शीख लोकसंख्या शांतताप्रिय आहे आणि त्यांचा खलिस्तानसारख्या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही. ते बोलत नाहीत कारण त्यांना हिंसेची आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची भीती वाटते.' असे मानले जाते की ज्याप्रमाणे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यात इंग्रजांची भूमिका होती, तसेच त्यांनी शिखांच्या बाबतीतही तेच करण्याचा प्रयत्न केला, असंही उज्ज्वल दोसांझ म्हणाले.

कॅनडासारख्या देशात खलिस्तानी घटक अनेकदा उपद्रव निर्माण करतात. कधी हिंदू मंदिरांवर हल्ले होतात तर कधी भारतीय वाणिज्य दूतावासांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधही कमालीचे बिघडले आहेत. उज्ज्वल दोसांझसारखे काही शीख नेते आहेत, जे खलिस्तानी घटकांविरुद्ध उघडपणे बोलत आहेत. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात ते एनडीपीचे खासदार राहिले आहेत. याशिवाय ते माजी पंतप्रधान पॉल मार्टिन यांच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. १९८५ पासून एअर इंडियाच्या विमानावर हल्ला झाला आणि ३२९ लोकांची हत्या केली आहे.

उज्ज्वल दोसांझ यांना अनेकदा धमक्या आल्या ते उघडपणे बोलत आहेत. ते म्हणतात की कॅनडात ८ लाख शीख राहतात, परंतु त्यापैकी काही मोजकेच या अजेंड्यात अडकतील. अशा लोकांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. ट्रुडो यांनी या प्रकरणात भारत सरकारच्या एजंटची भूमिका असल्याचा आरोप केल्यावर या प्रकरणाबाबत वाद सुरू झाला.

Web Title: Khalistan was created because of Trudeau Canadian Sikh leader exposes PM, alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.