"गुरपतवंत सिंग पन्नूने मर्यादा ओलांडली तर...", अमेरिकेचा खलिस्तानी दहशतवाद्याला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 01:17 PM2024-02-22T13:17:08+5:302024-02-22T13:18:11+5:30
Gurpatwant Singh Pannun : अमेरिका खलिस्तानी फुटीरतावाद्यांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न रिचर्ड वर्मा यांना विचारला आला होता.
Gurpatwant Singh Pannun (Marathi News): खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने जर आपली मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई केली जाईल, असे अमेरिकेचे उप परराष्ट्र सचिव रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे.
एएआयला दिलेल्या मुलाखतीत रिचर्ड वर्मा म्हणाले की, प्रत्येकाने कायद्याच्या कक्षेत काम करणे आवश्यक आहे. मला विशिष्ट प्रकरणांमध्ये जायचे नाही, परंतु प्रत्येकाने कायद्यात राहून काम केले पाहिजे. जर कोणी कायद्याची मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
अमेरिका खलिस्तानी फुटीरतावाद्यांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न रिचर्ड वर्मा यांना विचारला आला होता. यावेळी रिचर्ड वर्मा म्हणाले, अमेरिकन सरकार कोणत्याही प्रकारचा छळ सहन करणार नाही, विशेषत: मुत्सद्दींवर कोणतेही चुकीचे पाऊल स्वीकारले जाणार नाही. जेव्हा लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतात तेव्हा प्रत्येकासाठी नियम वेगळे असतात.
कोणत्याही मुत्सद्दी व्यक्तीचा छळ स्वीकारला जाणार नाही. आचरणाची मर्यादा काय आहे, हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही अशा कृत्यांवर कठोर कारवाई करू आणि अमेरिकेने यापूर्वीही अशी कारवाई केली आहे, असे रिचर्ड वर्मा यांनी सांगितले.
याचबरोबर, प्रत्येकाला माहित आहे की कोणत्याही हिंसाचारात किंवा हल्ल्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरले जाते. तसेच, सर्व भारतीय मुत्सद्दी अमेरिकेत पूर्णपणे सुरक्षित आहेत. आमच्या टीमने हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे, असेही रिचर्ड वर्मा पुढे म्हणाले.
दरम्यान, गेल्या वर्षी मार्चमध्ये खलिस्तानी समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात अवैधरित्या घुसून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय जुलै महिन्यातही भारतीय दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न झाला होता.