खालिस्तानवाद्यांचा मंदिर परिसरात घुसून हिंदूंवर हल्ला, कॅनाडाचे खासदार भडकले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 09:55 AM2024-11-04T09:55:25+5:302024-11-04T09:57:09+5:30

आर्य म्हणाले, "हिंदू-कॅनेडियन नागरिकांनी आपल्या समुदायाच्या सुरक्षिततेसाठी पुढे येऊन, आपल्या अधिकारांचा दावा सांगायला हवा आणि राजकारण्यांना जबाबदार धरायला  हवे, असे मी बऱ्याच दिवसांपासून सांगत आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही कॅनडातील हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत.

Khalistanists attacked Hindus by entering the temple area in brampton, Canada mp arya condemns | खालिस्तानवाद्यांचा मंदिर परिसरात घुसून हिंदूंवर हल्ला, कॅनाडाचे खासदार भडकले; म्हणाले...

खालिस्तानवाद्यांचा मंदिर परिसरात घुसून हिंदूंवर हल्ला, कॅनाडाचे खासदार भडकले; म्हणाले...

ब्रॅम्प्टनमध्ये हिंदू सभा मंदिर परिसरात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी हिंदू-कॅनडियन भाविकांवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेचा कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी निषेध केला आहे. या फुटीरतावाद्यांनी रेड लाईन क्रॉस केली आहे, जी कॅनडातील हिंसक दहशतवादाच्या उदयावर प्रकाश टाकते, असे म्हणत त्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे.

आर्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हल्ल्याचा एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. यासोबत, "आज कॅनडाच्या खालिस्तानवाद्यांनी एक रेड लाईन क्रॉस (लाल रेषा ओलांडली) आहे. ब्रॅम्पटनमध्ये हिंदू सभा मंदिर परिसरात कॅनडाच्या हिंदू भाविकांवर खालिस्तानवाद्यांकडून करण्यात आलेला हल्ला, कॅनडामध्ये खालिस्तानी फुटीरतावाद किती हिंसक झाला आहे, हे दर्शवते," असेही आर्य यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, "या अहवालात काही प्रमाणात सत्य आहे की, कॅनडाच्या राजकीय व्यवस्थेशिवाय, कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमध्येही खलिस्तानी फुटीरतावाद्यांची घुसखोरी झाली आहे," असे मला वाटे. एवढेच नाही, तर पुढे चिंता व्यक्त करत कॅनडाचे खासदार म्हणाले, "खलिस्तानी फुटीरतावादी कॅनडाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याचा फायदा उचलत आहेत आणि यासाठी त्यांना मोफत पास मिळत आहे."

हिंदू बंधूंना खास आवाहन -
आर्य पुडे म्हणाले, "हिंदू-कॅनेडियन नागरिकांनी आपल्या समुदायाच्या सुरक्षिततेसाठी पुढे येऊन, आपल्या अधिकारांचा दावा सांगायला हवा आणि राजकारण्यांना जबाबदार धरायला  हवे, असे मी बऱ्याच दिवसांपासून सांगत आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही कॅनडातील हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत.
 

Web Title: Khalistanists attacked Hindus by entering the temple area in brampton, Canada mp arya condemns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.