शरीफ यांचा चर्चेचा प्रस्ताव खान, कादरी यांनी फेटाळला
By admin | Published: August 19, 2014 01:39 AM2014-08-19T01:39:45+5:302014-08-19T01:39:45+5:30
विरोधी पक्षनेते इम्रान खान आणि मौलवी ताहिर-उल-कादरी यांच्यासोबतची कोंडी फोडण्यासाठी त्यांच्याशी बोलणी करण्याचे पाकिस्तान सरकारचे प्रयत्न सोमवारी अयशस्वी ठरले.
Next
इस्लामाबाद : विरोधी पक्षनेते इम्रान खान आणि मौलवी ताहिर-उल-कादरी यांच्यासोबतची कोंडी फोडण्यासाठी त्यांच्याशी बोलणी करण्याचे पाकिस्तान सरकारचे प्रयत्न सोमवारी अयशस्वी ठरले. सरकारने दिलेला प्रस्ताव या दोन्ही नेत्यांना उत्साहवर्धक वाटला नाही. दरम्यान, पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी पाचव्या दिवशीही निदर्शने सुरूच असून राजधानी इस्लामाबादेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
दरम्यान, शरिफ यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी खान यांच्या पक्षाचे संसदेतील सदस्य व खैबर पख्तुनख्वाच्या विधानसभेतील सदस्य वगळता इतर विधानसभांमधील सदस्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. खान यांनी शरीफ यांच्या विरुद्धची ही आरपारची लढाई असल्याचे काल म्हटले होते, तर कादरी यांना राजीनामा देण्यासाठी त्यांना 48 तासांची मुदत दिली होती. (वृत्तसंस्था)