किडनॅप झालेला मुलगा २४ वर्षांनी सापडला; वडिलांनी शोधणाऱ्यासाठी ठेवलेलं १२ कोटींचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:51 IST2025-03-21T17:50:30+5:302025-03-21T17:51:15+5:30

दोन वर्षांचा असताना एका मुलाचं घराजवळून अपहरण झालं होतं.

kidnapped son met father after 24 years | किडनॅप झालेला मुलगा २४ वर्षांनी सापडला; वडिलांनी शोधणाऱ्यासाठी ठेवलेलं १२ कोटींचं बक्षीस

किडनॅप झालेला मुलगा २४ वर्षांनी सापडला; वडिलांनी शोधणाऱ्यासाठी ठेवलेलं १२ कोटींचं बक्षीस

दोन वर्षांचा असताना एका मुलाचं घराजवळून अपहरण झालं होतं. मुलाच्या वडिलांनी त्याचा खूप शोध घेतला, पण मुलगा सापडलाच नाही. शेवटी वडिलांनी १२ कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं. मुलाला शोधून परत आणणाऱ्या व्यक्तीलाही रक्कम दिली जाईल असं म्हटलं. 

वडिलांनी अनेक वर्षे गेल्यानंतर आपल्या मुलाला भेटण्याची आशा सोडली होती, मात्र आता तब्बल २४ वर्षांनी त्यांचा हरवलेला मुलगा सापडला. मुलगा घरी आल्यावर वडिलांनी त्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी एक भव्य उत्सव आयोजित केला. मुलाला ३.५ कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ कार आणि भरपूर रोख रक्कम आणि इतर अनेक भेटवस्तू त्याच्या अभ्यासासाठी दिल्या, परंतु मुलाने यापैकी काहीही स्वीकारण्यास नकार दिला.

चीनमधील शेन्झेन शहरात ही घटना घडली आहे. १६ मार्च रोजी वडील झी यू यांनी त्यांच्या मुलाच्या आगमनाचे सेलिब्रेशन करण्यासाठी एक भव्य पार्टी आयोजित केली होती. त्यांनी मुलाला कोट्यवधींची मर्सिडीज-बेंझ सेडान कार आणि त्याच्या शिक्षणासाठी ठेवलेली रक्कम भेट दिली.

मुलाने नाकारल्या भेटवस्तू

मुलाने भेटवस्तू नाकारल्या. तो म्हणाला की, त्याला सध्या त्याची गरज नाही कारण तो अजूनही अभ्यास करत आहे.  भावनिक भेटीदरम्यान मुलाने सांगितलं की, माझे वडील यशस्वी आहेत आणि मला विश्वास आहे की, मी माझ्या कठोर परिश्रमाने या गोष्टी साध्य करू शकेन.

२००१ मध्ये मुलाचं झालं होतं अपहरण

जानेवारी २००१ मध्ये शेन्झेनमधील त्याच्या घराजवळ मुलगा खेळत होता. मग एका फळ विक्रेत्याने त्याचं अपहरण केलं, त्यावेळी तो फक्त दोन वर्षांचा होता. त्या दिवसापासून त्याचे वडील त्याला सतत शोधत होते. मात्र आता शोध घेतल्यानंतर एवढं मोठं बक्षीस कोणाला मिळालं, मुलाची माहिती कोणी दिली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
 

Web Title: kidnapped son met father after 24 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.