एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांत किडनी प्रत्यारोपण सुरक्षित; अवयवांची कमतरता कमी करण्यासाठी संशोधन फायदेशीर ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:49 PM2024-10-19T14:49:44+5:302024-10-19T14:51:03+5:30

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अमेरिकेत १९८ मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले. यानुसार किडनी एचआयव्ही संक्रमित व्यक्तीची असो अथवा एचआयव्ही संक्रमित नसलेल्या व्यक्तीची असो, यात परिणाम जवळजवळ सारखेच होते.

Kidney transplants safe in HIV-positive people; Research would be beneficial to reduce organ shortage | एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांत किडनी प्रत्यारोपण सुरक्षित; अवयवांची कमतरता कमी करण्यासाठी संशोधन फायदेशीर ठरणार

एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांत किडनी प्रत्यारोपण सुरक्षित; अवयवांची कमतरता कमी करण्यासाठी संशोधन फायदेशीर ठरणार

लंडन : एचआयव्ही बाधित लोकांचे अवयव इतर एचआयव्ही बाधित लोकांमध्ये बसविले जाऊ शकतात, हे अमेरिकेतील एका संशोधनात सिद्ध झाले. जगभरात अवयवदान करणाऱ्यांची कमतरता आणि प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता कमी करण्यासाठी हे संशोधन फायदेशीर ठरेल.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अमेरिकेत १९८ मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले. यानुसार किडनी एचआयव्ही संक्रमित व्यक्तीची असो अथवा एचआयव्ही संक्रमित नसलेल्या व्यक्तीची असो, यात परिणाम जवळजवळ सारखेच होते.

संशोधनात एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या लोकांवर चाचण्या घेण्यात आल्या. त्यांच्या किडनीने काम करणे बंद केले होते. एका गटात एचआयव्ही पॉझिटिव्ह व दुसऱ्यामध्ये एचआयव्ही निगेटिव्ह मृत दात्याकडून मिळालेली किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. 

दोन्ही गटांमध्ये व्हायरसची पातळी कमी झाली
एचआयव्ही पॉझिटिव्ह दात्या गटातील १३ रुग्ण आणि इतर गटातील चार रुग्णांमध्ये व्हायरसचे प्रमाण वाढले. त्यातील बहुतेकांनी एचआयव्हीची औषधे नियमित घेतली नव्हती. 

सर्व प्रकरणांमध्ये काही काळानंतर व्हायरसची पातळी कमी झाली. संशोधनाचे सह-लेखक डॉ. डोरी सेगाव म्हणाले की, यामुळे प्रत्यारोपणाची सुरक्षा आणि उत्कृष्ट परिणाम दिसून येतात.

लवकरच अवयव मिळण्याची शक्यता वाढेल
इंडियाना विद्यापीठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापक कॅरी फूट यांनी सांगितले की, एचआयव्ही बाधित लोकांना अवयव दान करण्यापासून परावृत्त केले जाते. संशोधनाच्या निकालांमुळे अवयव लवकर मिळण्याची शक्यता वाढेल. 

१९८ मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

Web Title: Kidney transplants safe in HIV-positive people; Research would be beneficial to reduce organ shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य