माणसापेक्षा मुले ठेवतात राेबाेटवर जास्त विश्वास, संशाेधनातील चकित करणारी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:58 AM2024-06-04T03:58:33+5:302024-06-04T03:58:48+5:30
अमेरिकेत ‘काॅम्प्युटर इन ह्युमन बिहेविअर’ या मासिकामध्ये यासंदर्भात केलेल्या शाेधावर लेख प्रकाशित झाला आहे.
वाॅशिंग्टन : गेल्या काही महिन्यांपासून एआय आणि राेबाेटचा मानवी जगातील हस्तक्षेपाबाबत बरीच चर्चा करण्यात येत आहे. नवे तंत्रज्ञान मानवावर हावी हाेत आहे का? असा सवाल यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. यासंदर्भात एका संशाेधनातून चकीत करणारा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलांचे भावविश्व फार वेगळे असते. मात्र, मुले मानवापेक्षा राेबाेटवर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यांच्याबद्दल जास्त सहानुभूती बाळगतात, असे या संशाेधनात म्हटले आहे.
अमेरिकेत ‘काॅम्प्युटर इन ह्युमन बिहेविअर’ या मासिकामध्ये यासंदर्भात केलेल्या शाेधावर लेख प्रकाशित झाला आहे. त्यात ६ वर्षांच्या मुलांचे वर्तन जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मानव आणि राेबाेटच्या विश्वसनीयतेची चाचणी राेजच्या वापरातील वस्तूंना चुकीचे लेबल लावून करण्यात आली. माहितीसाठी मुलांना काेणता स्राेत आवडताे, कशावर ते जास्त विश्वास ठेवतात तसेच राेबाेटचे काेणते वैशिष्ट्य मुलांना आकर्षित करते, याचा आता अभ्यास सुरू आहे.
काय आढळले?
आपले सिक्रेट राेबाेटसाेबत शेअर करण्यात मुले जास्त इच्छुक हाेती.
मुलांचा राेबाेटवर जास्त विश्वास दिसला. मुले मानवापेक्षा राेबाेटच्या सूचनांमध्ये जास्त रुची दाखवित हाेते.
राेबाेटबद्दल सहानुभूती
मुलांना विविध गटांमध्ये विभागण्यात आले. त्यांना मानव आणि राेबाेटवरील चित्रपट दाखविण्यात आले. त्यात नव्या आणि जुन्या नव्या वस्तूंवर लेबल लावताना दाखविण्यात आले. राेबाेटने केलेल्या चुकीबद्दल मुलांमध्ये त्याच्याप्रती सहानुभूती दिसून आली.