गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 07:55 PM2024-11-14T19:55:15+5:302024-11-14T19:55:57+5:30

इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हवाई हल्ल्याने गाझा बेचिराख झाला आहे. नुकतेच, उत्तर गाझातील इस्रायली हवाई हल्ल्यात एका मुलाचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. आता त्याच्या कुटुंबात केवळ तो एकटाच उरला आहे.

killed entire family In Israel attack on Gaza The neighbor said only one boy survived | गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

गाझामधील इस्रायलचा कहर थांबण्याचे नाव नाही. इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हवाई हल्ल्याने गाझा बेचिराख झाला आहे. नुकतेच, उत्तर गाझातील इस्रायली हवाई हल्ल्यात एका मुलाचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. आता त्याच्या कुटुंबात केवळ तो एकटाच उरला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या शेजाऱ्याने त्याला हातात उचलून धरले होते. याशिवाय, बेत हनूनमधील इतर लोक इस्रायलच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी परिसर सोडून दुसऱ्या ठिकाणी केले आहेत.

या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. हा व्हिडिओ 12 नोव्हेंबरचा आहे, यात, संबंधित शेजारी मुलाला हातात धरून आदल्या रात्रीचा भयावह प्रसंगसांगत आहेत. तो अत्यंत दु:खी होऊन म्हणाला, 'हा मुलगा त्याच्या कुटुंबात एकटाच उरला आहे. याचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले आहे. हे मूलही पूर्णपणे भाजले आहे. हा केवळ एकच उरला आहे.

इस्रायलनं अचानक केला होता हल्ला - 
संबंधित शेजारील व्यक्तीने सांगितले की, "ते (इस्रायली सैनिक) अचानकपणे जबरदस्त गोळीबार आणि स्फोट होत असतानाच आमच्या घरात शिरले. केवळ हा मुलगाच वाचला आहे." दरम्यान, परिसरातील ढिगाऱ्यातून या मुलाचे रेस्क्यू करण्यात आले. 

गाझा सिव्हिल डिफेन्सच्या म्हणण्यानुसार, बेत हानूनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झला आहे तर शेकडो कुटुंबांना शहर सोडावे लागले आहे. ते शहरसोडून इतरत्र जात आहेत. 

Web Title: killed entire family In Israel attack on Gaza The neighbor said only one boy survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.