किम जोंग ऊन यांनी हॉट डॉग खाण्यावर घातली बंदी, अचानक निर्णयाचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:45 IST2025-01-08T19:44:22+5:302025-01-08T19:45:48+5:30
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी हॉट डॉग या खाद्यपदार्थावर बंदी घातली आहे. या मागचे कारण जे सांगितले जात आहे, ते मजेशीर आहे.

किम जोंग ऊन यांनी हॉट डॉग खाण्यावर घातली बंदी, अचानक निर्णयाचं कारण काय?
अमेरिकेत स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉट डॉग खाद्यपदार्थाला उत्तर कोरियात गेल्या काही वर्षात खूपच पसंती मिळाली आहे. नेमकी याच खाद्यपदार्थावर उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी अचानक बंदी घातली आहे. हॉट डॉग बनवताना किंवा खाताना कोणी आढळले, तर त्याला शिक्षा केली जाणार आहे.
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. किम जोंग उन यांनी बंदी घालण्याचे कारण अमेरिका असल्याचे सांगितले जात आहे.
हॉट डॉग खाद्यपदार्थावर बंदी का?
जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, हा निर्णय पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, असे म्हटले जात आहे. अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव थांबवण्यासाठी हॉट डॉगवर बंदी घालण्यात आली आहे.
यापुढे जर कोणी हॉट डॉग खाताना किंवा बनवताना सापडला, तर त्याला देशातील कुख्यात असलेल्या कामाच्या छावण्यामध्ये शिक्षा भोगावी लागणार आहे.
भांडवलशाही संस्कृतीचे प्रतिक मानत यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरियातील उत्तरकडील प्रांत रयांगगांगमधील एका विक्रेत्याने सांगितले की, बाजारात बुदाए जिगे (हॉट डॉग) बंद झाले आहे. अधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे की, कोणी विक्री करताना दिसले, तर त्याचे दुकान बंद केले जाईल.