दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:49 AM2020-06-09T08:49:50+5:302020-06-09T08:51:28+5:30
दोन्ही देशांच्या सीमेवर फुगे उडविले जातात. यावर किम जोंग उन आणि त्याच्या अण्वस्त्र मोहिमेविरोधात वाईट लिहिले जाते. अनेकदा त्यामध्ये शिव्याही असतात.
सियोल : दक्षिण कोरियाने सीमेवर बदनामीकारक व विरोधात पत्रके वाटल्यामुळे उत्तर कोरियाने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने या शत्रू देशाशी सैन्य आणि राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत.
कोरियाच्या केंद्रीय वृत्तवाहिनीनुसार उत्तर कोरियांच्या सीमेवर त्यांच्या विरोधात पत्रके वाटण्यापासून दक्षिण कोरियाने या लोकांना रोखले नाही. यामुळे किम जोंग उनने याची कडक शब्दांत निंदा केली असून दक्षिण कोरियाविरोधात कठोर कारवाई केली आहे.
मंगळवारपासून यावर पाऊल उचचले जाणार असून दोन्ही देशांदरम्यानच्या संपर्क कार्यालयातील संचार लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईन बंद करण्यात येणार आहे. उत्तर कोरियाचे नागरिक द. कोरियाच्या अधिकाऱ्यांच्या विश्वासघातकी वागण्यामुळे खूप नाराज आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
#BREAKING North Korea will cut military and political communication lines to "enemy" South Korea on Tuesday, state media said, after threats over activists sending anti-Pyongyang leaflets over the border pic.twitter.com/ebbYN6rEyF
— AFP news agency (@AFP) June 8, 2020
किम जोंग उन गायब असताना त्यांची बहीण पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे. तिनेच उत्तर कोरियाच्या विद्रोहींविरोधात कारवाई न केल्यास दक्षिम कोरियासोबतचे सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली होती. यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर फुगे उडविले जातात. यावर किम जोंग उन आणि त्याच्या अण्वस्त्र मोहिमेविरोधात वाईट लिहिले जाते. अनेकदा त्यामध्ये शिव्याही असतात.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात
आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल