Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 05:12 PM2021-08-03T17:12:58+5:302021-08-03T17:13:42+5:30
Kim Jong Un Health: किम जोंग उनच्या छोटा मेंदू असते तिथे एक डाग दिसत आहे. हा डाग कशाचा आहे, कसा बनला ते माहिती नाही. किम सोल्जर कट ठेवत असल्याने कानाच्या वरपर्यंत केस कापलेले असतात. यामुळे डोक्यावरील त्वचा दिसत आहे.
प्योंगयांग : उत्तर कोरिया हा आपल्या देशातील घडामोडी गुप्त ठेवण्यासाठी जेवढा चर्चेत असतो, तेवढेच हुकुमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) देखील एक रहस्यच बनलेला असतो. सध्या त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यावरून चर्चा सुरू असून समोर आलेल्या फोटोंमध्ये किम खूपच अशक्त आणि थकलेला, वजन कमी झालेला दिसत होता. आता आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये किमच्या डोक्यावर मागील बाजुला मोठी पट्टी लावलेली दिसत आहे. (Big Mark on Kim jong un's head, covered by bandage)
Kim Jong Un: किम जोंग उन पुन्हा आजारी! वजन घटलेले, शरीर थकलेले...नवे फोटो धक्कादायक
NK न्यूज ने काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये किम जोंग उनच्या छोटा मेंदू असते तिथे एक डाग दिसत आहे. हा डाग कशाचा आहे, कसा बनला ते माहिती नाही. किम सोल्जर कट ठेवत असल्याने कानाच्या वरपर्यंत केस कापलेले असतात. यामुळे डोक्यावरील त्वचा दिसत आहे. महत्वाचे म्हणजे काही फोटोंमध्ये हा डाग बँडेजद्वारे झाकलेला दिसत आहे. गडद हिरव्या रंगाची ही खून एखाद्या जखमेसारखी किंवा डोक्यात मागून कोणीतरी प्रहार केल्यासारखी भासत आहे.
वृत्तानुसार 24 ते 27 जुलैला एका मिलिट्री इव्हेंटवेळी ही खून दिसली होती. जूनमध्ये ही खून दिसली नव्हती. तर नंतरच्या 27-29 जुलैला झालेल्या एका वॉर वेटरन कॉन्फ्रेन्समध्ये देखील ही खून दिसली होती.
किम जोंग उन हा त्याच्या क्रूरतेसाठी ओळखला जाते. छोट्या छोट्या चुकांवरून किम अधिकाऱ्यांना मृत्यूदंडासारखी शिक्षा करतो. हाच किम जोंग उन सध्या आजारी आहे. किम जोंग उन याचे गेल्या वर्षभरात 20 किलोंनी वजन कमी झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा सैन्य दलातील अधिकाऱ्यांना अभिवादन करतानाचा फोटो समोर आला होता. महत्वाचे म्हणजे एक महिन्याआधीच तेथील सरकारी मीडियाने किमच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली होती. इतरवेळी किम यांच्या आरोग्याची चर्चा होत नाही, तसेच याबाबतची माहिती लपविली जाते. मात्र, आता त्यांच्या घटलेल्या वजनावर चर्चा होऊ लागली आहे व चिंताही व्यक्त होत आहे.