किम जोंग उनने हद्दच केली! एका पाठोपाठ एक दोन वेळा बॅलेस्टिक मिसाइलचा धमाका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:49 PM2023-12-18T20:49:00+5:302023-12-18T20:52:19+5:30
अमेरिकेने बजावूनही उत्तर कोरियाने केली चाचणी
North Korea Missile : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा दक्षिण कोरियाला धमकावणारी क्षेपणास्त्रे डागली आहेत. यावेळी किम जोंग उनच्या सैन्याने कमी पल्ल्याच्या क्षेपाणास्त्रा सोबतच लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्रही सोडले आहे. उत्तर कोरियाच्या लष्कराने सोमवारी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर दक्षिण कोरियाने हा इशारा दिला. दक्षिण कोरियाने ते लांब पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असण्याची शक्यता चाचणीनंतर व्यक्त केली होती. किमचे सैन्य दररोज समुद्रात क्षेपणास्त्रांची चाचणी घेते आणि अशा स्थितीत उत्तर कोरियाचा संरक्षण मित्र असलेल्या अमेरिकेच्या अडचणी वाढतात. दक्षिण कोरियाने अमेरिका आणि जपानलाही याबाबत माहिती दिली आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती दिली असून, हे क्षेपणास्त्र जपानच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, चाचणीच्या वेळी या भागात एकही जहाज नव्हते.
North Korea launches internationally banned long-range ballistic missile pic.twitter.com/oS9G6QoKV0
— TRT World Now (@TRTWorldNow) December 18, 2023
अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर क्षेपणास्त्र चाचणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तज्ञांच्या मते, उत्तर कोरियाच्या सतत वाढत्या क्षेपणास्त्र चाचण्या हा कदाचित उत्तर कोरियाच्या वाढत्या आण्विक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आण्विक प्रतिबंधक योजनांना चालना देण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने उचललेल्या पावलांचा निषेध असावा. नुकतीच दक्षिण कोरिया आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची वॉशिंग्टनमध्ये बैठक झाली. याच्या निषेधार्थ उत्तर कोरियाकडून ताजी चाचणी करण्यात आल्याचे समजते.
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला धमकी दिली होती
उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. उत्तर कोरिया प्रत्युत्तरात कठोर भूमिका घेईल, अशी धमकी दिली. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, जखमी किंवा नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. उत्तर कोरिया दररोज क्षेपणास्त्र चाचणी घेतो, दक्षिण कोरियाला धमकावतो. शेकडो क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे, ज्यामध्ये कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचीही चाचणी घेण्यात आली आहे.