Kim Jong Un : शेजारच्या देशात सत्तांतरासाठी किम जोंग उनने आखला खतरनाक प्लॅन, घुसवले ५० हजार लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:59 PM2023-01-25T13:59:09+5:302023-01-25T14:00:01+5:30

Kim Jong Un : दक्षिण कोरियामधील हुकूमशाहा किम जोंग उनने दक्षिण कोरियामध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी रचलेल्या भयानक कटाचा आता टप्प्या टप्प्याने उलगडा होत चालला आहे.

Kim Jong Un made a dangerous plan to take power in a neighboring country, infiltrated 50 thousand people | Kim Jong Un : शेजारच्या देशात सत्तांतरासाठी किम जोंग उनने आखला खतरनाक प्लॅन, घुसवले ५० हजार लोक

Kim Jong Un : शेजारच्या देशात सत्तांतरासाठी किम जोंग उनने आखला खतरनाक प्लॅन, घुसवले ५० हजार लोक

Next

दक्षिण कोरियामधील हुकूमशाहा किम जोंग उननेदक्षिण कोरियामध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी रचलेल्या भयानक कटाचा आता टप्प्या टप्प्याने उलगडा होत चालला आहे. हल्लीच आलेल्या एका रिपोर्टनुसार किम जोंग उन ५० हजार सिक्रेट एजंटांच्या माध्यमातून दक्षिण कोरियाचा पाया पोखरून काढत आहे. 

कोरियन इन्स्टिट्युट ऑफ लिबरल डेमोक्रसीच्याएका संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार किमच्या या ५० हजार गुप्त सैनिकांमधील अनेकजण निर्वासित म्हणून दक्षिण कोरियाच्या सीमेमध्ये घुसले होते. किमने शेजारील देशातील सरकार उलथवून आपला मर्जीतील व्यक्तीला सत्तेत बसवण्यासाठी जो प्लॅन आखला होता. त्याचं नाव डबल क्रॉस कॉन्सपिरेसी असं ठेवण्यात आलं होतं.  या मोहिमेमध्ये उत्तर कोरियातील काही निवडक लोकांचा छळ करून त्यांना घुसखोर बनवून दक्षिण कोरियाच्या सीमेपलीकडे पोहोचवण्यात येते.

रिपोर्टनुसार किमचे गुप्तहेर स्वत:ला निर्वासित, पीडित असल्याचे दाखवतात. आपण किम जोंग उनचे विरोधक असल्याचे सांगून शेजारील दक्षिण कोरियामध्ये पर्रवेस मिळवतात. यापैकी काही जणांची लबाडी उघड झाल्यावर त्यांना पकडून तुरुंगात पाठवले जाते. मात्र जे आपली ओळख लपवातत, ते मात्र दक्षिण कोरियामधील व्यवस्था विस्कळीत करण्याचं काम पद्धतशीरपणे करतात. तर तुरुंगात असलेले किमचे प्रशिक्षित एजंट तुरुंगातूनच त्या देशाची व्यवस्था बिघडवण्याचं काम सुरू ठेवतात.

कोरियन इन्स्टिट्युट ऑफ लिबरल डेमोक्रसीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्तर कोरियातील लोक दक्षिण कोरियामधील तुरुंगात बंद असणे हे किमच्या गुप्त योजनेचा भाग आहे. किमच्या इराद्यांविषयी बोलायचं झाल्यास तो जेव्हा शेजारील देशावर मोठा हल्ला करेल, तेव्हा खास संकेत मिळताच तुरुंगामध्ये बंद असलेले हे कैदी तुरुंगात बंड पुकारून उठाव करतील. 

दक्षिण कोरियाने स्वत: अशा गुप्त हेरांची एक एक कडी जोडून किमच्या सत्तांतराच्या कारस्थानाला दुजोरा दिला आहे. सियोलमधील गुप्तचर पोलिसांनी तुरुंगाच्या आत आणि बाहेर असलेल्या अशा एजंट्सच्या ठिकाणांवर कारवाई करून किम जोंग उनच्या खतरनाक इराद्यांना उजेडात आणले आहे. किमने या सिक्रेट एजंट्सना पुरेसं प्रशिक्षण आणि गुप्त उपकरणांसह पाठवलं आहे. त्यामाध्यमातून ते संधी मिळताच गोपनीय माहिती आपल्या देशात पाठवत आहेत.  

Web Title: Kim Jong Un made a dangerous plan to take power in a neighboring country, infiltrated 50 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.