किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 08:42 AM2020-04-25T08:42:46+5:302020-04-25T12:59:15+5:30
हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.
बिजिंग : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन हे अत्यवस्थ असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी केला होता. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उन यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते. मात्र, आता किम जोंग उनवर उपचारासाठी डॉक्टरांची टीम उत्तर कोरियाला पाठविल्यामुळे पुन्हा एकदा संशयाचे मळभ दाटू लागले आहेत.
हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरानाविरुद्ध उपायावर चर्चा केली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांच्या आजोबांचीच जयंती होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे किम जोंग उन हे अत्यवस्थ असल्याची चर्चा होऊ लागली होती. प्रकृतीच्या कारणामुळे किम यांना नेतेपद सोडावे लागले, तरी उत्तर कोरियात फारशी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही. त्यांच्या बहीण किम यो जोंग यांचा सरकारमध्ये चांगलाच प्रभाव आहे. शिवाय किम परिवाराकडेच नेतृत्व ठेवण्याबाबत बहुतांश सदस्यांचे मत आहे.
उत्तर कोरियाने हे नाकारले असले तरीही ताज्या घडामोडी किम यांच्या प्रकृतीकडेच लक्ष वेधतात. चीनने उत्तर कोरियाला वैद्यकीय तज्ज्ञांची टीम पाठविली आहे. रॉयटर्सनुसार डॉक्टरांची टीम किम जोंग उन यांना सल्ला देण्यासाठी पाठविण्यात आली आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय संबंध पाहणाऱ्या एका वरिष्ठ सदस्याच्या नेतृत्वाखाली ही टीम बिजिंगहून कोरिलायाला गेली आहे.
यापूर्वी कोरियाच्या एका सूत्राने सांगितले होते की, किम जिवंत आहेत आणि लवकरच लोकांसमोर येणार आहेत. त्यांच्या तब्येत ठीक नाही याचा अर्थ असा होत नाही की ते खूपच आजारी आहेत. तसेच लोकांसमोर न येण्याच्या परिस्थितीत आहेत.
आणखी वाचा...
CoronaVirus चीनचा कांगावा! म्हणे "आमचे टेस्टिंग किट उत्तम, भारतीयांनाच वापरायचे ज्ञान नाही"
मोठा दिलासा! आजपासून सर्व दुकाने उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार
आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2020