ट्रम्प यांचे किम जोंग यांना पत्र, कोरोनाचा सामना करण्यासाठी दिली मदतीची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 04:33 PM2020-03-22T16:33:55+5:302020-03-22T16:39:09+5:30

किम जोंग यांची बहीण  किम यो जोंग यांनी म्हटले आहे, की या पत्रात डीपीआरके (डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया अर्थात उत्तर कोरिया) आणि संयुक्त राज्य अमेरिका यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्याच्या योजनेसंदर्भात लिण्यात आले आहे.

kim jong un sister claims us president donald trump has offered to cooperation in fight against corona | ट्रम्प यांचे किम जोंग यांना पत्र, कोरोनाचा सामना करण्यासाठी दिली मदतीची हाक

ट्रम्प यांचे किम जोंग यांना पत्र, कोरोनाचा सामना करण्यासाठी दिली मदतीची हाक

googlenewsNext
ठळक मुद्देकिम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांनी केला आहे ट्रम्प यांच्या पत्राचा खुलासा उत्तर कोरियाने शनिवारी कमी पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहेआमच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असे किम जोंग यांनी सांगितले आहे

प्‍योंगयांग - वॉशिंग्टन आणि प्‍योंगयांग यांच्यातील ताणलेल्या संबंधातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्‍तर कोरियाला कोरोना व्हायरससारऱ्या महामारीचा सामना करण्यासाठी मदतीचा हाक दिली आहे. विशेष म्हणजे, शनिवारी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र परिक्षण केले असतानाही ट्रम्प यांनी उत्‍तर को‍रियाला हा प्रस्ताव दिला आहे.

किम जोंग यांची बहीण  किम यो जोंग यांनी म्हटले आहे, की या पत्रात डीपीआरके (डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया अर्थात उत्तर कोरिया) आणि संयुक्त राज्य अमेरिका यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्याच्या योजनेसंदर्भात लिण्यात आले आहे. यात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या कठीन परिस्थितीत सहकार्य वाढवण्यावर आणि या व्हायरसच्या महामारीशी सामना करण्यासंदर्भात जोर देण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमाने ही माहिती दिली आहे.

उत्तर कोरियाने शनिवारी कमी पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली. या क्षेपणास्त्रांच्या चाचणीदरम्यान किम जोंग उन स्वत: तेथे उपस्थित होता. उत्तर कोरियाने शनिवारी उत्तर प्योंगान प्रांतातून दोन शॉर्ट रेंजची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पूर्वेकडील समुद्रात डागली. न्यूज एजन्सी योनहॅप यांनी दक्षिण कोरियाच्या 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ'च्या हवाल्याने ही माहिती दिली होती. 

अमेरिका आणि चीनने उत्तर कोरियाला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवून पुन्हा चर्चेचे आवाहन केले होते. मात्र हे आवाहन धुडकावून लाव उत्तर कोरिया सातत्याने आपली सैन्य शक्ती वाढविण्यावर जोर देत आहे. एकिकडे संपूर्ण जगात कोरोना थैमाव घालत असतावा दुसरीकडे मात्र उत्तर कोरीया आपला अन्विक शस्त्रसाठा वाढवत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी किम जोंग यांना पत्र लिहून दोहोतील संबंध बळकट करण्यासंदर्भात अपील केली आहे.  सियोलच्या सैन्याने, उत्तर कोरियाने लवकरात लवकर अशा प्रकारचे परिक्षण बंद करायला सांगितले आहे. तर जापानने, उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र आमच्या सीमेपर्यंत पोहोचू शकले नाही, असे म्हटले आहे. 

उत्तर कोरियात एकही रुग्ण नसल्याचा किम जोंग यांचा दावा -

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असा दावा केला होता. 30 दिवसांपासून प्रत्येकाला विलग ठेवून, सीमा बंद करून आणि चीनबरोबर व्यापार थांबवून आम्ही कोरोनावर मात केली आहे, असा दावा किम जोंग यांनी केला. पण हे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उत्तर कोरिया कोरोनाचे संकट लपविण्याचा प्रयत्न करत आहे. सीआयएचे उत्तर कोरियाचे तज्ज्ञ जंग एच पाक यांनी म्हटले आहे, की कोरोनाची लागण झाल्याची एकही घटना उत्तर कोरियात न होणे अशक्य आहे. किम जोंग-उनने उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था, मानवी हक्कांचे उल्लंघन करणे आणि अन्य गुन्ह्यांपासून लक्ष वळविण्यासाठी हा अविश्वसनीय दावा केला आहे.

Web Title: kim jong un sister claims us president donald trump has offered to cooperation in fight against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.