किम जोंग उन संकटात; बहिणीला बनविले उत्तराधिकारी? दिली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:54 PM2020-08-21T12:54:55+5:302020-08-21T12:58:12+5:30
किम यो जोंग यांना अशावेळी ही जबाबदारी देण्यात आली आहे, जेव्हा किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या होत्या. जवळपास 21 दिवस उन गायब होते. त्यानंतर उत्तर कोरियाने त्यांचा एक व्हिडीओ जारी करत ते एकदम ठीक असल्याचा दावा केला होता.
प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने बहिणीवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. यामुळे त्याच्या पाठीमागे पक्ष सांभाळणारी किम यो जोंग देशाची दुसरी शक्तीशाली नेता बनली आहे. या घटनाक्रमामुळे किम जोंग उन यांच्या तब्येतीविषयी उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे.
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने सांगितले की, 32 वर्षांची किम यो जोंग हिला अमेरिका आणि दक्षिण कोरियाशी संबंधित प्रकरणांवर लक्ष घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी तिला उत्तर कोरियाचा प्रभारी बनविण्यात आले आहे. यावर उत्तर कोरियाने दावा केला आहे की, किम जोंग उन यांच्या सरकारवरील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी काही अधिकार बहिणीला दिले आहेत. उन यांचाच उत्तर कोरियावर पूर्ण अधिकार असून यो जोंग या केवळ काही देशांसाठीच महत्वाच्या आहेत.
किम यो जोंग यांना अशावेळी ही जबाबदारी देण्यात आली आहे, जेव्हा किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या होत्या. जवळपास 21 दिवस उन गायब होते. त्यानंतर उत्तर कोरियाने त्यांचा एक व्हिडीओ जारी करत ते एकदम ठीक असल्याचा दावा केला होता. मात्र, आज तीन ते चार महिने उलटूनही किम कुठल्याही समारंभात किंवा सरकारी बैठकांना दिसलेले नाहीत.
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर समितीच्या सदस्या ताई क्यूंग यांनी सांगितले की, गुरुवारी उत्तर कोरियाच्या सत्तेचे हस्तांतरण झाले. किम जोंग उन अद्याप ताकदवर असले तरीही ते हळूहळू सारे अधिकार त्यांच्या बहिणीकडे सोपवत आहेत. याचाच अर्थ किम जोंग उन यांनी किम यो जोंग यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे.
किम यांना पत्नी री सोल जू हिच्यापासून तीन मुले आहेत. ही मुले कधीही सार्वजनिक स्वरुपात बाहेर आलेली नाहीत. त्यांना कोणीच पाहिलेले नाहीय. 10, 7 आणि तीन वर्षांची ही मुले आहेत. उत्तर कोरियाची जबाबदारी स्वीकारण्यास ते असमर्थ आहेत. यामुळे किम यांची बहीणच उत्तराधिकारी बनणार आहे.
किम जोंग उनचा मृत्यू?
हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. तर किम यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती उत्तर कोरिया प्रशासनाकडून देण्यात येत होती. मात्र किम गेल्या २० दिवसांपासून जगासमोर न आल्यानं त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. ११ एप्रिलपासून किम जगासमोर आले नव्हते. उत्तर कोरियामध्ये किम यांची हुकूमशाही राजवट असल्यानं अनेक गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. त्यामुळेच त्यांच्या प्रकृतीबद्दलची खात्रीलायक माहिती पुढे येत नव्हती. उत्तर कोरियातल्या वर्तमानपत्रांनी ११ एप्रिल रोजी किम यांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं कोणतंही छायाचित्र जगासमोर आलं नाही. या दिवसांत त्यांच्या प्रकृतीबद्दलचं वृत्त जागतिक माध्यमांनी दिलं होतं. मात्र याबद्दल उत्तर कोरियाच्या माध्यमांनी कोणतंही वृत्त दिलं नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या
'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्
कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव
शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत; कमी व्याजाच्या 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डचे वाटप
Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर
मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अॅप लाँच
तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले