किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 10:31 AM2020-04-26T10:31:52+5:302020-04-26T16:54:27+5:30
जवळपास १५ दिवसांपासून किम गायब आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.
प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. यामुळे चीनने काल किमला वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीमच कोरियाला पाठविली होती. आज दिवसभरात सोशल मिडीयावर किम जोंग उन यांचा मृत्यू किंवा ब्रेन डेड याबाबत मोठी चर्चा झडत होती. याबाबत उद्या मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
जवळपास १५ दिवसांपासून किम गायब आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. यामुळे सोमवारी किम यांच्या तब्येतीविषयी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाच्या सर्वात मोठ्या नेत्यांच्या मृत्यूची घोषणा उशिराने याआधीही करण्यात आलेल्या आहेत. किम यांच्या वडिलांच्या मृत्यूची घोषणा ४८ तासांनी करण्यात आली होती.
हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरानाविरुद्ध उपायावर चर्चा केली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांच्या आजोबांचीच जयंती होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे किम जोंग उन हे अत्यवस्थ असल्याची चर्चा होऊ लागली होती. प्रकृतीच्या कारणामुळे किम यांना नेतेपद सोडावे लागले, तरी उत्तर कोरियात फारशी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही. त्यांच्या बहीण किम यो जोंग यांचा सरकारमध्ये चांगलाच प्रभाव आहे. शिवाय किम परिवाराकडेच नेतृत्व ठेवण्याबाबत बहुतांश सदस्यांचे मत आहे.
२०११ मध्ये किम जोंग इल यांचा मृत्यू १७ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आल्याने झाला होता. तेव्हा टीव्ही अँकर री चून यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी काळे कपडे घातले होते. उद्या कोरियाच्या लोकांच्या नजरा चून यांच्याकडेच लागलेल्या असणार आहेत. किम जोंग इल यांच्यावर नऊ दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळीही असेच झाले तर किम जोंग उन यांच्यावर ५ मे रोजी अंत्यसंस्कार केले जातील.
इल यांच्या मृत्यूच्या घोषणेवेळी किंम जोंग उन यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले होते. यावेळीही जोंग यांच्या मृत्यूवेळी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा...
युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला
CoronaVirus पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवट? कोरोनाआडून इम्रान खानची 'विकेट' काढणार
Video "चार बायका, २६ मुले, त्यांना खायला कुठून आणू?" पाकिस्तानीची व्यथा
किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही क्रूर आहे बहीण किम यो जोंग
किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता
...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन