'जर सुखाने झोपायचं असेल तर....' ज्यो बायडन यांना किम जोंग उनच्या बहिणीचा इशारा....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 12:44 PM2021-03-16T12:44:44+5:302021-03-16T12:49:33+5:30
North Korea Warns America: खास बाब म्हणजे बायडन प्रशासनाचे अधिकारी टोकिया आणि सियोलला पोहोचले आहेत. किम यो जोंग ही आपला भाऊ किम जोंग उन याची प्रमुख सल्लगार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (Joe Biden) यांना उत्तर कोरियाकडून इशारा मिळाला आहे. नॉर्थ कोरिया (North Korea) चे प्रमुख किम जोंग उन (Kim Jong Un) यांची बहीण किम यो जोंग (Kim Yo Jong) ने इशारा दिला की, 'अमेरिकेने असं कोणतंही काम करू नये ज्याने त्यांची झोप उडेल'. खास बाब म्हणजे बायडन प्रशासनाचे अधिकारी टोकिया आणि सियोलला पोहोचले आहेत. किम यो जोंग ही आपला भाऊ किम जोंग उन याची प्रमुख सल्लगार आहे.
उत्तर कोरियाने बायडन यांच्या प्रशासनावर पहिल्यांदाच निशाणा साधत अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्य अभ्यासाची निंदा केली आहे. किम यो ने अमेरिकेला इशारा दिला आहे की जर 'पुढील चार वर्षापर्यंत रात्री आरामात झोपायचं असेल, तर त्यांनी भडकवण्याची कोणतीही कारवाई करू नये'.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन उत्तर कोरिया आणि इतर क्षेत्रीय मुद्द्यांवर जपान आणि दक्षिण कोरियासोबत बातचीत करण्यासाठी आशियात आले आहेत. ज्यानंतर किम यो जोंगने मंगळवारी आपली भूमिका सांगितली.
दोन्ही मंत्री टोकियोमध्ये आज(मंगळवारी) बातचीत करतील. किम यो जोंग म्हणाली की, उत्तर कोरियाला जर दक्षिण कोरियासोबत सहयोग करता येत नसेल तर ते सैन्य तणाव कमी करण्यासाठी झालेल्या २०१८ द्विपक्षीय करारातून बाहेर येण्याचा विचार करेल. आंतर-कोरियाई संबंध सांभाळण्यासाठी तयार केलेली एक दशक जुनी सत्तारूढ पार्टीची समिती भंग करेल.
प्योंगयांगचं अधिकृत वृत्तपत्र 'रोदोंग सिनमन' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ती म्हणाली की, 'आम्ही दक्षिण कोरियाचा व्यवहार आणि त्यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवू. जर त्यांचा व्यवहार आणखी पेटवणारा असेल तर आम्ही असामान्य पाउल उचलू'. ती म्हणाली की, ती या संधीचा वापर अमेरिकेच्या नव्या प्रशासनाला सल्ला देण्यासाठी करेल.
किम यो जोंग म्हणाली की, 'जर त्यांना चार वर्ष आरामात झोपायचं असेल, तर त्यांच्यासाठी हेच चांगलं राहील की, त्यांनी अशा गोष्टी करू नये, ज्याने सुरूवातीलाच त्यांची झोप उडेल'. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात वार्षिक सैन्य अभ्यास गेल्या आठवड्यात सुरू झाला. जो गुरूवारपर्यंत चालेल. याआधीही अनेकदा उत्तर कोरिया या सैन्य अभ्यासात सहभागी होण्यासाठी तयार होता आणि याचं उत्तर त्यांनी मिसाइल परिक्षण करून दिलं.