किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 01:35 PM2024-10-13T13:35:41+5:302024-10-13T13:36:18+5:30

North Korea : किम यो जोंग यांनी स्टेट मीडिया KCNA द्वारे सांगितले की, अलीकडील ड्रोन घुसखोरी ही गंभीर घटना आहे.

Kim Jong Un's Sister Warns Of "Horrible Disaster" As A Response To Drones | किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."

किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."

North Korea Threat South Korea: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांची बहीण किम यो जोंग यांनी शनिवारी दक्षिण कोरियाला मोठा इशारा दिला आहे. जर दक्षिण कोरियाचे ड्रोन उत्तर कोरियावर उडताना आढळले तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असे किम यो जोंग म्हणाल्या. राजधानी प्योंगयांगच्या आकाशात दक्षिण कोरियाचे ड्रोन दिसल्यावर उत्तर कोरियाकडून किम यो जोंग यांनी हे वक्तव्य केले आहे.

किम जोंग-उन यांची बहीण किम यो जोंग यांनी स्टेट मीडिया KCNA द्वारे सांगितले की, अलीकडील ड्रोन घुसखोरी ही गंभीर घटना आहे. ड्रोन घुसखोरी ओळखण्यात आम्ही अपयशी ठरल्याचे सांगत किम यो जोंग यांनी दक्षिण कोरियाच्या लष्करावर टीका केली. शत्रू देशाचे सैन्य याला जबाबदार आहे. उत्तर कोरियाविरोधी पत्रक (जे ड्रोनद्वारे पाठवण्यात आले होते) या घटनेचे गांभीर्य दर्शविते, असेही किम यो जोंग म्हणाल्या.

दरम्यान, दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने उत्तर कोरियाच्या आरोपांवर लगेच प्रतिक्रिया दिली. या आरोपांना पुष्टी देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर उत्तर कोरियाने सांगितले की, दक्षिण कोरियाकडून ड्रोन आणि फुगे पाठवण्यात आले आहेत, ज्यामध्ये किम जोंग-उन यांच्यावर टीका करणारी पत्रके आणि मदत सामग्री पाठवली जात आहे. 

उत्तर कोरिया अशा कारवायांना आपल्या सरकारच्या विरोधात मानतो आणि फुग्यांद्वारे कचरा पाठवून त्याला प्रत्युत्तर देत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढताना दिसून येत आहे. अलीकडच्या काळात उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये सुरक्षा आणि राजकीय संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे.

किम जोंग-उन यांची एकुलती एक बहीण
किम जोंग-उन यांची किम यो-जोंग या एकुलती एक बहीण आहेत. किम जोंग-उन यांच्यापेक्षा त्या फक्त ४ वर्षांनी लहान आहे. त्यांनी आपल्या भावासोबत स्वित्झर्लंडमधील बर्न येथे शिक्षण घेतले. दरम्यान १०१८ मध्ये, किम यो-जोंग प्रकाशझोतात आल्या, जेव्हा त्या दक्षिण कोरियाला भेट देणाऱ्या किम घराण्याच्या पहिली सदस्य बनल्या. त्यावेळी त्या हिवाळी ऑलिम्पिकला शिष्टमंडळाची सदस्य म्हणून गेल्या होत्या.

Web Title: Kim Jong Un's Sister Warns Of "Horrible Disaster" As A Response To Drones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.