किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:54 AM2018-01-08T00:54:36+5:302018-01-08T11:11:56+5:30

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी फोनवर बोलण्याची सशर्त तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दाखविली व उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील बोलण्यातून सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी आशाही व्यक्त केली.

 Kim Jong will speak to them, but ... Donald Trump's conditional discussion is ready | किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी

किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी

Next

कँप डेव्हीड : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी फोनवर बोलण्याची सशर्त तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दाखविली व उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील बोलण्यातून सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी आशाही व्यक्त केली.
दक्षिण कोरियाशी अधिकृत पातळीवर पुढील आठवड्यात चर्चेची तयारी उत्तर कोरियाने गेल्या शुक्रवारी दाखविली. ही चर्चा झाली, तर दोन वर्षांनंतरची ती पहिली असेल. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांच्या केलेल्या चाचण्यांनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिका आणि दक्षिण कोरियाने लष्करी उपाययोजना लांबणीवर टाकल्यावर उत्तर कोरियाने आपल्या शेजारी दक्षिण कोरियाशी चर्चेची तयारी दाखवली.
येथे वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, किम जोंग उन यांच्याशी मी बोलणी करण्यास तयार आहे, परंतु सशर्त. निश्चितच मी त्यांच्याशी चर्चा करेन. मला त्यात काहीही अडचण नाही.
ट्रम्प अध्यक्ष बनताच उन यांच्याशी त्यांचा शाब्दिक संघर्ष सुरू झाला होता. ट्रम्प यांनी उन यांनी अण्वस्त्रांच्या व क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यापासून ‘रॉकेट मॅन’ असाच त्यांचा उल्लेख केला आहे. किम जोंग यांनी या आठवड्यात माझ्या टेबलवर अण्वस्त्राची कळ (बटण) आहे, असे म्हटले होते, त्यावर ट्रम्प यांनी माझ्याकडे त्याच्यापेक्षाही मोठी कळ असल्याचे म्हटले होते. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील चर्चेत पुढील महिन्यात दक्षिण कोरियात होणार असलेल्या हिवाळी आॅलिम्पिक्सचा आणि उभय देशांतील संबंधांचा विषय असेल, असे अपेक्षित आहे.
ट्रम्प यांनी दक्षिण व उत्तर कोरियातील चर्चेतून तणाव निवळण्यास मदत होईल, असे सूचित केले व मी सतत निर्माण केलेल्या दडपणामुळेच राजनैतिक पातळीवर मार्ग निघत असल्याचे श्रेयही घेतले. ‘बघा, सध्या ते आॅलिम्पिक्सवर
चर्चा करीत आहेत. ती एक सुरुवात आहे व ती मोठी आहे. जर आम्ही
त्यात सहभागी झालो नसतो, तर त्यांनी चर्चा केलीच नसती,’ असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प अध्यक्ष बनताच ऊन यांच्याशी त्यांचा शाब्दिक संघर्ष सुरू झाला होता. ट्रम्प यांनी उन यांनी अण्वस्त्रांच्या व क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यापासून ‘रॉकेट मॅन’ असाच त्यांचा उल्लेख केला आहे. किम जोंग यांनी माझ्या टेबलवर अण्वस्त्राची बटण आहे, असे म्हटले होते. त्यावर ट्रम्प यांनी माझ्याकडे त्याच्यापेक्षाही मोठी कळ असल्याचे म्हटले होते.

Web Title:  Kim Jong will speak to them, but ... Donald Trump's conditional discussion is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.