व्हिसाची सर्वोत्तम संधी कोणत्या विद्यापीठात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 07:48 AM2022-07-17T07:48:54+5:302022-07-17T07:51:00+5:30
शैक्षणिक कोर्स निवडण्यासाठी अमेरिकेत उच्च शिक्षण देणाऱ्या हजारो शैक्षणिक संस्था आहेत.
कोणत्या विद्यापीठात मला विद्यार्थी व्हिसा मिळण्याची संधी सर्वोत्तम आहे?
उत्तर : विद्यार्थी व्हिसा देण्यासाठी तीच संस्था उत्तम आहे जिथे तुमच्या पसंतीचा शैक्षणिक विषय, वैयक्तिक पसंत आणि झेपेल असे अर्थकारण यांचा मेळ बसतो. उच्च शिक्षणातील वैविध्यपूर्ण पर्यायांच्या उपलब्धतेमुळे अमेरिका हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे जगातील एक प्रमुख ठिकाण आहे. विद्यार्थी व्हिसा प्राप्त करून घेण्यासाठी सर्वप्रथम स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिझिटर्स प्रोग्राम (SEVP) सर्टिफाईड स्कूलमधे सर्वप्रथम अर्ज करावा. महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे नामांकन करण्याची कोणतीही अधिकृत व्यवस्था अमेरिकेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या गरजा आणि प्राधान्य, संस्थेचा व्याप आणि आकारमान यानुसार स्वतः संशोधन करणे महत्त्वाचे आहे.
शैक्षणिक कोर्स निवडण्यासाठी अमेरिकेत उच्च शिक्षण देणाऱ्या हजारो शैक्षणिक संस्था आहेत. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारास उत्तम संधी देणारी कोणतीही विशेष संस्था नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर शैक्षणिक संस्था निवडली आणि तुम्ही तुमच्या शिक्षणाची व्यवस्थित तयारी, तुमचा खर्च करण्याची खात्रीशीर योजना आणि तुमच्या विद्यार्थी व्हिसाचा योग्य वापर हे दिसून आले तर त्याचा उपयोग व्हिसा मुलाखतीवेळी होऊ शकतो. तुम्ही कुठे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे, का घेतला आहे असे प्रश्न कदाचित कॉन्सुलर अधिकारी तुम्हाला विचारू शकतो. त्यामुळे अशा प्रश्नांची तयारी ठेवा. याव्यतिरिक्त, आपल्या शिक्षणासाठी कोणते कॉलेज अथवा विद्यापीठ योग्य कोर्स देत आहे, याचसोबत विद्यार्थ्यांनी आपण कोणत्या भूभागात जात आहोत, तेथील शिक्षणेतर बाबी, सांस्कृतिक घटक यांचाही विचार करायला हवा. आगामी काही वर्षे तेच तुमचे घर असल्यामुळे जागा, आकारमान, विद्यापीठात असलेल्या सुविधा यांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील काही प्रमुख विद्यापीठांचा प्रवेश दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे, हेही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वसमावेशक विद्यापीठांची यादी विचारात घेऊन अर्ज केल्यास तुमच्या गरजेनुसार योग्य प्रवेश मिळणे सुलभ होईल.
अमेरिकेतील शिक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी तसेच विद्यार्थी व्हिसा प्रक्रियेसाठी कृपया आमच्या travel.state.gov या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आम्हाला educationusa@state.gov या पत्त्यावर ईमेल करावा.
महत्त्वाची सूचना
व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्वीटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.