ऑस्ट्रेलियात सायबर हल्ला घडवल्याचा आरोप; चीनच्या 'MSS' गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 08:27 PM2020-06-20T20:27:59+5:302020-06-20T20:28:49+5:30
१९८३ मध्ये एसएसएसची स्थापना झाली. काऊंटर इंटेलिजेंस, परदेशी इंटेलिंजेस, राष्ट्रीय सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी यासाठी ही संस्था काम करते.
बिजींग – जगातील प्रत्येक देशाकडे त्यांची गुप्तचर यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी काम करत असते, चीनमध्येही मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी म्हणजे एमएसएस गुप्तपणे कार्यरत असते, पण इतर देशांच्या तुलनेत चीनची ही यंत्रणेचे अनेक रहस्य आहेत. ना याची अधिकृत वेबसाईट आहे ना कोणते संपर्क आणि ना कोणी प्रवक्ता. याच्या बद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे, MSS चीनची मुख्य नागरिक गुप्तचर एजेंसी आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या सायबर हल्ल्याला एमएसएसला जबाबदार धरलं गेले आहे.
१९८३ मध्ये एसएसएसची स्थापना झाली. काऊंटर इंटेलिजेंस, परदेशी इंटेलिंजेस, राष्ट्रीय सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी यासाठी ही संस्था काम करते. इतर मंत्रालयांप्रमाणेच त्याच्या देशभरात प्रांतीय आणि महानगरपालिका शाखा देखील आहेत. सिचुआनमधील सुरक्षा दलात २० वर्षे घालवलेले एमएसएसचे अध्यक्ष चेन वेनकिंग आहेत. २०१५ मध्ये गुप्तचर यंत्रणेत जॉईन होण्यापूर्वी चेन यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या वॉचडॉगमध्ये दोन वर्षे माजी भ्रष्टाचारविरोधी अधिकारी वांग किशनचे डेप्युटी म्हणून काम पाहिले.
इंटेलिजेंस एजन्सीच्या प्रतिनिधींची नावे जाहीर केली जाऊ नयेत परंतु त्यापैकी एकाची मा झियानची ओळख अमेरिकेत स्थायिक झालेल्या फरार उद्योगपती गुओ वेंगुईशी असलेल्या संबंधांमुळे उघडकीस आली. चोंगकिंगचे पोलीस प्रमुख वांग लिजुन यांना बीजिंगमध्ये नेले असता दुसरे उपप्रमुख क्वी शिन यांची ओळख उघडकीस आली.
कसं करते एमएसएस काम?
सन २०१७ मध्ये लागू केलेल्या राष्ट्रीय इंटेलिजेंस कायद्यांतर्गत, एमएसएस इतर गुप्तचर यंत्रणेसारखी चीनमध्ये आणि बाहेर जासूसी करणे, परदेशी आणि देशांतर्गत संस्था, लोकांचे देखरेख आणि तपास करणे, हेरगिरी म्हणून काम करते. या गुप्तचर संस्थेला माहिती लीक करणाऱ्याला १५ दिवसांपर्यंत ताब्यात ठेवता येते. चीनच्या फौजदारी प्रक्रिया कायद्यांतर्गत, सामान्य पोलिसांसारख्या राष्ट्रीय सुरक्षा गुन्ह्यां संदर्भात त्यांना ताब्यात घेण्यास किंवा अटक करण्याचा अधिकारही एमएसएसकडे आहे.
ऑस्ट्रेलियाने हुवावेच्या ५ जी नेटवर्कवर बंदी आणली आहे यासाठी एमएसएस ऑस्ट्रेलिया सरकार आणि इंडस्ट्रीवर सायबर हल्ला करत आहे. ऑस्ट्रेलियातील दोन माजी सरकारी अधिका-यांनी न्यूज पोर्टल एबीसीला सांगितले आहे की, सायबर हल्ल्यामागे एमएसएसचा हात असल्याचे पुराव्यांवरून दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले होते की, देशातील सरकार, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य संस्थांवर हल्ला झाला आहे. काही कामांमध्ये कोविड -१९ शी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्नही सुरू आहे.