अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठीची योग्यता काय? त्यासाठीची प्रक्रिया कशी असते? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:31 PM2020-09-19T13:31:50+5:302020-09-19T13:32:25+5:30

अर्ज करण्याआधी व्हिसा मुलाखतीसाठी अपॉईेंटमेंट घेणं गरजेचं

know the eligibility to get a US student visa and its procedure | अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठीची योग्यता काय? त्यासाठीची प्रक्रिया कशी असते? 

अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठीची योग्यता काय? त्यासाठीची प्रक्रिया कशी असते? 

Next

प्रश्न: अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी माझी निवड झाली आहे. मी अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करू शकतो का? त्यासाठीची प्रक्रिया काय?

उत्तर: १७ ऑगस्टपासून अमेरिकेच्या नवी दिल्लीच्या दूतावासात आणि मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि मुंबईतील वाणिज्य दूतावासात विद्यार्थ्यांच्या व्हिसा अर्जावर मर्यादित स्वरुपात प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. आमच्या आरोग्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन आम्ही आमचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मर्यादित स्वरुपात कामकाज सुरू केलं आहे.

अर्ज करण्याआधी व्हिसा मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट घ्या. मुलाखतीत सवलत असलेल्या व्यक्तींना अपॉईंटमेंट मिळणार नाही.

त्यानंतर ustraveldocs.com/in वर जाऊन त्वरित मुलाखतीसाठी विनंती दाखल करा. 'नॉनइमिग्रंट व्हिसा ऍप्लिकेशन'मधील 'अप्लाय फॉर ऍन एक्सपेडिटेड अपॉईंटमेंट'वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सूचना वाचण्यास मिळतील. त्वरित मुलाखतीसाठी विनंती करताना संबंधित कागदपत्रं सोबत जोडा. उदा. तुमच्या स्वीकारण्यात आलेला आय-२० अर्ज.

तुम्ही सुरुवातीचे काही दिवस वर्गात अनुपस्थित राहिले असल्यास कृपया शाळेच्या अधिकृत अधिकाऱ्याशी (डीएसओ) संपर्क साधा. विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीबद्दलचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम डीएसओ करतात. तुमच्या अभ्यासाच्या तारखांमध्ये बदल झाला असल्यास त्वरित मुलाखतीसाठी अर्ज करण्याआधी अपडेटेड आय-२० अर्ज मिळवा. त्यावर नव्या तारखांची नोंद असायला हवी.

विद्यार्थ्यांच्या व्हिसा अधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. आमच्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याच्या अर्जावर कमीत कमी वेळेत प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे. मात्र अतिशय कमी अपॉईंटमेंट उपलब्ध असल्यानं आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या विनंत्यांवर कार्यवाही करू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा.

नेहमीच्या इमिग्रंट आणि नॉनइमिग्रंट व्हिसासाठी दूतावास बंदच आहे. अपडेट्ससाठी आमचं संकेतस्थळ आणि ustraveldocs.com/in ला भेट द्या.
 

Web Title: know the eligibility to get a US student visa and its procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Visaव्हिसा