‘कोहिनूर पाकला मिळू शकत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 04:21 AM2016-04-28T04:21:28+5:302016-04-28T04:21:28+5:30

कोहिनूर हिरा पुन्हा पाकिस्तानला मिळू शकत नाही. कारण, १८४९ मध्ये एका करारांतर्गत तो ब्रिटनला सोपविला होता, असे मत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने येथे उच्च न्यायालयात मांडले.

'Kohinoor could not get a chance' | ‘कोहिनूर पाकला मिळू शकत नाही’

‘कोहिनूर पाकला मिळू शकत नाही’

Next

लाहोर : कोहिनूर हिरा पुन्हा पाकिस्तानला मिळू शकत नाही. कारण, १८४९ मध्ये एका करारांतर्गत तो ब्रिटनला सोपविला होता, असे मत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने येथे उच्च न्यायालयात मांडले.
१०८ कॅरेटचा हा हिरा परत आणण्यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल झालेली आहे. यावर सध्या सुनावणी सुरू आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात ही भूमिका मांडली. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराजा रणजित सिंह यांनी १८४९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीसोबत एक करार केला होता. त्यानुसार हा हिरा ब्रिटनला सोपविण्यात आला होता. त्यामुळे हा हिरा आता परत मागता येणार नाही. (वृत्तसंस्था)

दरम्यान, कोहिनूर हिरा परत मिळविण्यासाठी भारत सरकारही अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

Web Title: 'Kohinoor could not get a chance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.