कोहिनूर हिरा भारताकडून बळजबरीने घेतला; ब्रिटनच्या राजघराण्याची प्रथमच कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 05:46 AM2023-06-05T05:46:14+5:302023-06-05T05:46:43+5:30
विजयाचे प्रतीक म्हणून कोहिनूर प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.
लंडन : ईस्ट इंडिया कंपनीने भारताकडून कोहिनूर हिरा बळजबरीने घेतल्याचे ब्रिटनच्या राजघराण्याने प्रथमच मान्य केले आहे. महाराजा दुलीप सिंग यांना हा हिरा देण्यास भाग पाडण्यात आले होते.
ब्रिटनमधील टॉवर ऑफ लंडनमध्ये राजघराण्यातील दागिन्यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, लाहोर करारानुसार कोहिनूर देण्याची अट दुलीप सिंग यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. हा मजकूर बर्किंगहॅम पॅलेसच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या मान्यतेनंतर प्रदर्शनात लिहिला गेला आहे. खरंतर, टॉवर ऑफ लंडनच्या प्रदर्शनात कोहिनूरसह अनेक मौल्यवान हिरे आणि दागिन्यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. येथे कोहिनूरचा इतिहासही अनेक व्हिडीओ आणि सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितला जात आहे. विजयाचे प्रतीक म्हणून कोहिनूर प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)