उ. कोरियाची तीन क्षेपणास्त्रांची चाचणी
By admin | Published: July 20, 2016 05:37 AM2016-07-20T05:37:12+5:302016-07-20T05:37:12+5:30
उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून मंगळवारी पुन्हा तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली
सेऊल : उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून मंगळवारी पुन्हा तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रांनी ५०० ते ६०० कि.मी. एवढे अंतर पार केले. ही क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियात कुठेही हल्ला करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, उ. कोरियाने पुन्हा चिथावणीखोर कृत्य केल्याची टीका दक्षिण कोरियाने चाचणीनंतर केली.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने क्षेपणास्त्र विरोधीप्रणाली बसविण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड विरोध असूनही उ. कोरियाने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. आजच्या चाचणीस सकाळी ५.४५ वाजता प्रारंभ झाला. ५५ मिनिटांत तिन्ही क्षेपणास्त्रांची चाचणी पूर्ण झाली. या क्षेपणास्त्रांनी ५०० ते ६०० कि.मी. एवढे अंतर पार केले.
उत्तर कोरियाने घेतलेल्या
तीन क्षेपणास्त्रांच्या चाचणीचा
आपण तासाभरात छडा लावला, असा दावा अमेरिकी लष्कराने केला. उ. कोरियाने ज्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. त्यातील दोन स्कड, तर एक रोडोंग क्षेपणास्त्र असण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
कॅलिफोर्नियातील मिडिलबरी इंटरनॅशनल स्टडीजचे वरिष्ठ संशोधक मेलिस्सा हनहाम यांनी ही क्षेपणास्त्र चाचणी तांत्रिक नाही, तर राजकीय असल्याचे सांगितले. उत्तर कोरियाचा सहकारी समजल्या जाणाऱ्या चीनने या चाचणीवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तथापि, जपानने उत्तर कोरियाची ही चाचणी सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन असून, या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी ही अत्यंत धोकादायक बाब असल्याचे म्हटले आहे.