Kulbhushan Jadhav Case : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 05:54 PM2021-11-17T17:54:06+5:302021-11-17T17:55:32+5:30

Kulbhushan Jadhav : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती.

kulbhushan jadhav case Pakistan parliament passes bill kulbhushan jadhav the right to appeal | Kulbhushan Jadhav Case : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा 

Kulbhushan Jadhav Case : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा 

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या (Pakistan) तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार देण्यासाठी पाकिस्तानने संसदेच्या संयुक्त अधिवेशनात (Pakistan parliament) एक विधेयक मंजूर केले आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने पाकिस्तानला विलंब न करता भारताला कॉन्सुलर अॅक्सेस देण्यास सांगितले होते.

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावत, पाकिस्तानने कॉन्सुलर ऍक्सेस नाकारल्याला आणि फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै 2019 मध्ये दिलेल्या एका निर्णयात म्हटले होते, की पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दोशी ठरविण्याच्या निर्णयाचे आणि शिक्षेचे प्रभावीपणे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करावा. एवढेच नाही तर, पाकिस्तानने कूलभूषण जाधव यांना लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी योगेय व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असेही आयसीजेने आपल्या निर्णयात म्हटले होते. 

Web Title: kulbhushan jadhav case Pakistan parliament passes bill kulbhushan jadhav the right to appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.