इराणने ज्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर हल्ला केला, त्याच संघटनेने भारताच्या कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:47 PM2024-01-17T13:47:03+5:302024-01-17T13:47:45+5:30

पाकिस्तान दहशतवादी संघटनेवर आज इराणने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

Kulbhushan Jadhav of India was abducted by the same Pakistani terrorist organization that Iran attacked | इराणने ज्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर हल्ला केला, त्याच संघटनेने भारताच्या कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले

इराणने ज्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर हल्ला केला, त्याच संघटनेने भारताच्या कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले

इराणने मंगळवारी पाकिस्तानच्या अल-अदल या दहशतवादी संघटनेवर हल्ला केला. ही संघटना सीमेपलिकडील देशात दहशतवादी घटना घडवून आणते. याच दहशतवादी संघटनेने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले होते. यानंतर त्यांनी जाधव यांना आयएसआयच्या ताब्यात दिले होते. 

दावोस परिषदेत पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

जैश अल-अदल या संघटनेने कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते. यानंतर जाधव यांना पाकिस्तानमध्ये आणण्यात आले. पाकिस्तानमध्ये कुलभूषण यांना हेरगिरी प्रकरणात अडकवण्याचा कट रचला. पाकिस्तानी एजन्सींनी जाधव यांना हेरगिरी प्रकरणात अडकवले, त्यानंतर तेथील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. जाधव अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. दरम्यान भारताने त्यांना पाकिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी प्रय़त्न सुरू केले आहेत. कुलभूषण जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयातही सुरू आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दोन दिवसांपूर्वीच इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांची भेट घेतली होती आणि या बैठकीच्या अवघ्या ४८ तासांनंतर इराणने पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-उल-अदलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्याचा संबंध कुलभूषण जाधव यांच्याशी जोडला जात आहे. कुलभूषण जाधव यांच्याविरोधात जैश-अल-अदल आणि पाकिस्तानने रचलेल्या कटाची ही शिक्षा असल्याचे मानले जात आहे.

जैश अल-अदलने इराणच्या सीमेवर हल्ला केला

गेल्या काही महिन्यांत जैश अल-अदलने इराणच्या सीमेवर अनेकदा दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांबाबत इराणने पाकिस्तानवर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला झाला होता, यामध्ये सुमारे ११ सुरक्षा जवान शहीद झाले होते. इराणने या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवत पाकिस्तानला फटकारले होते. पाकिस्तान आपल्या सीमांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, असे इराणने म्हटले होते.

इराणने जैश अल-अदलचे दोन तळ क्षेपणास्त्र आणि ड्रोनने उद्ध्वस्त केले आहेत. इराणच्या या हल्ल्यात दोन निष्पाप मुलींचा मृत्यू झाला आहे तर तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. इराणच्या या कृतीचा पाकिस्तानने निषेध केला आहे.     

Web Title: Kulbhushan Jadhav of India was abducted by the same Pakistani terrorist organization that Iran attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.