अमेरिकन डॉलरपेक्षा ३ पट अधिक 'या' देशाच्या पैशाचं मूल्य; तरीही सर्वात ताकदवान का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:48 IST2025-03-08T14:47:02+5:302025-03-08T14:48:03+5:30
जगात सर्वात जास्त वापरली जाणारं चलन अमेरिकन डॉलर आहे. परंतु एक असाही देश आहे ज्यांचं चलन अमेरिकन डॉलरपेक्षा ३ पटीने अधिक किंमतीचे आहे.

अमेरिकन डॉलरपेक्षा ३ पट अधिक 'या' देशाच्या पैशाचं मूल्य; तरीही सर्वात ताकदवान का नाही?
अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS देशांना डॉलरला पर्याय म्हणून दुसरी करेन्सी आणल्यास त्या देशांवर १०० टक्के टॅरिफ लावू असा इशारा दिला होता. डॉलर हे जगात सर्वात जास्त ताकदवान मानलं जाते. प्रत्येक देशाकडे स्वत:चं चलन असते, भारताकडे रूपया, पाकिस्तानकडेही रूपया तसे अमेरिकेकडे डॉलर आहे. जगातील प्रत्येक देशाच्या पैशाचं मूल्य वेगवेगळे असते. जगातील बहुतांश देशाच्या चलनाची तुलना अमेरिकन डॉलरची केली जाते. भारतीय रूपयाचे मूल्य अमेरिकेच्या १ डॉलरच्या तुलनेत ८७.१५ रूपये आहे.
जगात सर्वात जास्त वापरली जाणारं चलन अमेरिकन डॉलर आहे. परंतु एक असाही देश आहे ज्यांचं चलन अमेरिकन डॉलरपेक्षा ३ पटीने अधिक किंमतीचे आहे. परंतु हा देश सर्वात ताकदवान नाही. कुवैतचं दिनार अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३ पट जास्त महाग आहे. एका कुवैती दिनारची किंमत ३.२५ अमेरिकन डॉलर आहे. म्हणजेच कुवैती दिनार हे अमेरिकन डॉलरपेक्षाही मजबूत आहे. मग अनेकांना प्रश्न पडला असेल कुवैती दिनार अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक किंमतीचे असूनही जगात कुवैत सर्वात ताकदवान देश का नाही? त्याचेच उत्तर जाणून घेऊया.
काय आहे कारण?
अमेरिकन जीडीपी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. कुवैत त्या तुलनेने कुठेच नाही. त्याशिवाय कुवैती दिनार काही भागातच वापरली जाते तर अमेरिकन डॉलर जागतिक चलन आहे. डॉलर जगातील रिझर्व्ह करेन्सी आहे. जगभरातील देश परकीय चलनासाठी डॉलरचा वापर करतात. त्यामुळेच कुवैती दिनारच्या तुलनेने अमेरिका डॉलर कमकुवत असूनही ते सर्वात ताकदवान देश नाहीत.
ट्रम्प यांची BRICS देशांना धमकी
'ब्रिक्स देश डॉलरला पर्याय शोधणार आणि आम्ही फक्त पाहत बसायचे, ते दिवस गेले आता. आम्हाला ब्रिक्स देशांकडून शब्द हवाय की, ते नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत किंवा अमेरिकन डॉलरच्या जागी इतर कोणत्याही चलनाला समर्थन देणार नाहीत. असे केल्यास, त्यांना 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल किंवा वाढणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेपासून दूर राहावे लागेल,' अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना खडसावले होते.