‘आॅस्कर’मध्ये वैविध्याची उणीव

By admin | Published: January 21, 2016 03:16 AM2016-01-21T03:16:23+5:302016-01-21T03:16:23+5:30

यंदा आॅस्करच्या नामांकनामध्ये विविधता नसल्याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू झाली असून त्यात अकादमी अध्यक्षांसह अनेकांनी उडी घेतली आहे.

Lack of diversity in 'Oscars' | ‘आॅस्कर’मध्ये वैविध्याची उणीव

‘आॅस्कर’मध्ये वैविध्याची उणीव

Next

लॉस एंजिल्स : यंदा आॅस्करच्या नामांकनामध्ये विविधता नसल्याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू झाली असून त्यात अकादमी अध्यक्षांसह अनेकांनी उडी घेतली आहे.
यंदा आॅस्करसाठी नामांकन करताना कोणत्याही कृष्णवर्णीय अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा समावेश झालेला नाही. त्यातून हा वाद उद्भवला आहे. आॅस्करमध्ये बदल घडवून आणण्याची प्रक्रिया फार मंद गतीची आहे. त्यामुळे माझे मन खट्टू झाले आहे, असे अकादमी अध्यक्ष चेरिल बुनी इक्सास म्हणाल्या. यंदा सलग दुसऱ्या वर्षी गौरेत्तर अभिनेत्यांना अभिनयाच्या श्रेणीत नामांकन मिळालेले नाही. त्यामुळे दिग्दर्शक स्पाईक ली आणि अभिनेत्री जेडा पिकेटने २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या दोघांच्या बहिष्कारामुळे अकादमी अध्यक्ष चेरिल यांनीही तीव्र चिंता व्यक्त केली.

Web Title: Lack of diversity in 'Oscars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.