गलवानच्या 'त्या' हिंसक झटापटीत चीनचे किती सैनिक मारले गेले? ड्रॅगननं पहिल्यांदाच मान्य केलं; दिले शौर्य पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 02:26 PM2021-06-01T14:26:27+5:302021-06-01T14:28:06+5:30
गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी लढताना मारला गेलेला पीएलएचा सैनिक चेन हॉन्गजुनला चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीसीपी) जारी केलेला 'शतकातील हिरो' हा किताब दिला आहे. या यादीत एकूण 29 चिनी नागरिक आहेत.
नवी दिल्ली - चीननं पहिल्यांदाच आधिकृतरित्या मान्य केले आहे, की गलवान खोऱ्यातील त्या हिंसक झटापटीत त्यांचे चार सैनिक मारले गेले होते, तर एक सैनिक जखमी झाला होता. चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमीशनने (सीएमसी) शुक्रवारी या सर्व सैनिकांना शौर्य पदक देऊन सन्मानित केले. मात्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी म्हटले आहे, की या हिंसाचारात चीनचे 45 सैनिक मारले गेले होते.
चेन हॉन्गजूनला देण्यात आला 'शतकातील हिरो'चा किताब -
चीनमधील सरकारी टीव्ही सीजीटीएनने सांगितले, की सीएमसीने शुक्रवरी मारल्या गेलेल्या या सर्व सैनिकांना फर्स्ट क्लास मेरिट सायटेशन आणि मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. सीजीटीएनने दिलेल्या वृत्तानुसार, गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी लढताना मारला गेलेला पीएलएचा सैनिक चेन हॉन्गजुनला चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीसीपी) जारी केलेला 'शतकातील हिरो' हा किताब दिला आहे. या यादीत एकूण 29 चिनी नागरिक आहेत. ज्यांनी गेल्या 100 वर्षांत चीनच्या सीमेचे संरक्षण, कोरियन युद्ध, जपानसोबतचे युद्ध, पोलिसिंग आणि आरोग्य सेवा आदिंत आपले महत्वाचे योगदान दिले.
आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले!
दोन्ही देशांत झाली होती भयंकर झटापट -
चीनने गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या सैनिकाला दिलेल्या 'शतकातील हीरो' या किताबावरून समजू शकते, की 15-16 जून 2020 च्या रात्री पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवर दोन्ही देशांच्या सैन्यात झालेली झटापट किती भयंकर असेल. खरे तर, यावेळी एकही गोळी चालली नव्हती. याशिवाय चीनने इतर सैनिक, चेन जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन यांना फर्स्ट क्लास मेरिट सायटेशन दिले आहे. चिनी सैनिकांचे नेतृत्व करणारे एक कर्नल, क्यू फेबाओ (रेजिमेंटल कमांडर) या हिंसक झटापटीदरम्यान गंभीर जखमी झाले होते. त्यांना 'हिरो कर्नल'ची उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, सीजीटीएनने गलवानचे नाव न घेता म्हटले आहे, की 'जून महिन्यात एका सीमा वादात' हे नुकसान झाले आहे. मात्र, ग्लोबल टाइम्सने स्पष्ट शब्दात लिहिले आहे, की गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीत (15-16 जून 2020) ही हाणी झाली आहे.
चीनचे 45 सैनिक मारले गेले होते, भारताचा दावा -
भारत आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या चकमकीत चीनचे किमान 45 सैनिक मारले गेले होते. मात्र, सीएमसीने मारल्या गेलेल्या एकूण सैनिकांची संख्या सांगितलेली नाही. केवळ ज्या सैनिकांना सन्मानित करण्य आले, त्याच सैनिकांची माहिती देण्यात आली आहे. सीएमसी, ही चीनमधील सर्वात मोठी सैन्य संस्था आहे आणि चीनचे राष्ट्रपती, शी जिनपिंग या संस्थेचे चेअरमन आहेत.
CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका!
गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीत भारताच्या एकूण 20 जवानांना वीरमरण आले होते. त्यांपैकी सहा जणांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र आणि पाच इतर जवानांना (चार मरणोत्तर) शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.