Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता; लाहोर कोर्टाकडून शिक्षा रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:27 PM2021-11-07T15:27:03+5:302021-11-07T15:27:58+5:30

Hafiz Saeed: या सर्वांविधोरात आरोप सिद्ध करण्यात तक्रारकर्ते अपयशी ठरले, त्यामुळे शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता केली.

lahore high court has acquitted six leaders of hafiz Saeed jamaat ud dawah in a terror financing case | Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता; लाहोर कोर्टाकडून शिक्षा रद्द!

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता; लाहोर कोर्टाकडून शिक्षा रद्द!

Next

लाहोर: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद (Hafiz Saeed) सह जमात-उद-दावाच्या सहा नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणात लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याशिवाय न्यायालयाने लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने या सहा जणांना सुनावलेली शिक्षाही रद्द केली आहे. या प्रकरणी पोलीस कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करू शकले नाहीत, असे सांगितले जात आहे. तर, यंदाच्या एप्रिलमध्ये लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदसह सहा जणांना प्रत्येकी नऊ वर्षांची शिक्षा सुनावली होती. 

हाफिज सईद हा जमात-उद-दावा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करतो. जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना २००८ च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असून, या हल्ल्यात सहा अमेरिकी लोकांसह १६६ लोक मारले गेले होते. यापूर्वी हाफिज सईदसह या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य पुरवल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. 

पंजाब पोलिसांच्या सीटीडी विभागाने गुन्हा दाखल केला होता

दहशतवादाला अर्थसहाय्य पुरवल्याप्रकरणी पंजाब पोलिसांच्या सीटीडी विभागाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. यामध्ये प्रा. मलिक जफर इक्बाल, याह्या मुजाहिद (जमात-उद-दावाचा प्रवक्ता), नसरुल्लाह, समिउल्लाह, उमर बहादूर यांचा समावेश होता. तर, हाफिज सईदचा मेहुणा हाफिज अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हे सर्वजण निधी गोळा करत होते आणि प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तोयबाला बेकायदेशीरपणे वित्तपुरवठा करत होते. दहशतवादाच्या आर्थिक मदतीतून जमा झालेल्या निधीतून बनवलेल्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.

दरम्यान, मुख्य न्यायमूर्ती मुहम्मद अमीर भाटी आणि न्या. तारिक सलीम शेख यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हाफिज सईदसह सहा नेत्यांविरुद्ध लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेला निकाल रद्द केला. या सर्वांविधोरात आरोप सिद्ध करण्यात तक्रारकर्ते अपयशी ठरले, त्यामुळे शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता केली, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: lahore high court has acquitted six leaders of hafiz Saeed jamaat ud dawah in a terror financing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.