‘लख्वीवर मुंबई हल्ल्याचा आरोप ठेवा’

By admin | Published: May 21, 2016 05:49 AM2016-05-21T05:49:22+5:302016-05-21T05:55:27+5:30

झकी-उर-रहमान लखवीसह इतर ६ जणांविरुद्ध १६६ लोकांच्या मृत्यूप्रकरणी हल्ल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात येणार

'Lakhvi accuses Mumbai attacks' | ‘लख्वीवर मुंबई हल्ल्याचा आरोप ठेवा’

‘लख्वीवर मुंबई हल्ल्याचा आरोप ठेवा’

Next

लाहोर : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार व लष्कर-ए-तोयबाचे हस्तक कमांडर झकी-उर-रहमान लखवीसह इतर ६ जणांविरुद्ध १६६ लोकांच्या मृत्यूप्रकरणी हल्ल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने हा आदेश दिला. मुंबईवरील या हल्ल्यात १६६ जण मरण पावले होते. त्यात अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. या प्रकरणी प्रत्येक आरोपीवर हे आरोप निश्चित केले जाणार आहेत, असे न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन एका ज्येष्ठ न्यायालयीन अधिकाºयाने सांगितले. मात्र न्यायालयाने या सात संशयितांची उलटतपासणी घेण्यास परवानगी दिलेली नाही. या सर्वांवर ठेवण्यात आलेल्या आरोपात सुधारणा करावी आणि प्रत्येक आरोपीवर हल्ल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवावा, अशी मागणी करणारी याचिका सरकारी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी दहशतवादविरोधी न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींवर हत्येला चिथावणी दिल्याचा आरोप व्यक्तिश: ठेवावा की नाही यावरून सरकारी आणि बचाव पक्षांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता.

>मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात १६६ जण ठार आणि अन्य ३०० जण जखमी झाले होते. मृतांत ६ अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. गेल्या सात दिवसांत या प्रकरणी एकही सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी २५ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

Web Title: 'Lakhvi accuses Mumbai attacks'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.