लख्वीप्रकरणी पाकची पुन्हा बोलाचीच कढी
By admin | Published: July 13, 2015 01:55 AM2015-07-13T01:55:06+5:302015-07-13T01:55:06+5:30
रशियातील उफा येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांच्या बैठकीत मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्याला वेग देण्याचा
रशियातील उफा येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांच्या बैठकीत मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्याला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला खरा; पण पाक पंतप्रधान नवाज शरीफ या प्रकरणात फारसे काही करू शकतील, असे दिसत नाही.
कारण या खटल्यातील मुख्य आरोपी व मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याने या प्रकरणी आवाजाचे नमुने देण्यास इन्कार केला असून, पाक सरकारही त्यासाठी याचिका दाखल करणार नसल्याचे आता स्पष्ट
झाले आहे. लख्वीचे वकील रिझवान अब्बासी यांनी लख्वीची ही भूमिका स्पष्ट केली
आहे. माझ्या अशिलाने आधीही आवाजाचे नमुने देण्यास विरोध
केला होता व तो आताही यास विरोध करील, असे अब्बासी यांनी सांगितले आहे. लख्वीच्या आवाजाचा
नमुना मिळविण्याचा प्रश्न आता संपला आहे. २०११ साली आम्ही त्याच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता; पण न्या. मलिक अक्रम यांनी हा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आता पुन्हा त्याच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा प्रश्नच नाही,
असे सरकारी वकील चौधरी
अजहर यांनीही स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या प्रकरणातील हवा संपली आहे. आरोपीच्या आवाजाचे नमुने खटल्यात सादर करण्यासाठी कोणताही कायदा नाही, त्यामुळे हे नमुने मिळणार नाहीत, असे चौधरी यांनी सांगितले.
भारत व पाक पंतप्रधानांच्या रशिया येथील बैठकीत मुंबई हल्ल्याच्या खटल्याला वेग देण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी आरोपीच्या आवाजाचे नमुने सादर करण्याचे ठरले आहे; पण तसा कायदा पाकिस्तानात नाही, भारतात नाही आणि अमेरिकेतही नाही, असे सरकारी वकील चौधरी यांनी म्हटले आहे. भारत व पाक पंतप्रधानांच्या रशिया येथील बैठकीत मुंबई हल्ल्याच्या खटल्याला वेग देण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी आरोपीच्या आवाजाचे नमुने सादर करण्याचे ठरले आहे; पण तसा कायदा पाकिस्तानात नाही, भारतात नाही आणि अमेरिकेतही नाही, असे सरकारी वकील चौधरी यांनी म्हटले आहे. (वृत्तंसस्था)