पाकने सोडले लखवीला पुन्हा मोकाट

By admin | Published: April 11, 2015 12:52 AM2015-04-11T00:52:44+5:302015-04-11T00:52:44+5:30

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर व मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लखवी याची पाकिस्तानी तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे.

Lakhvi resigns from Pakistan | पाकने सोडले लखवीला पुन्हा मोकाट

पाकने सोडले लखवीला पुन्हा मोकाट

Next

लाहोर : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर व मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लखवी याची पाकिस्तानी तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यात लष्कर ए तोयबाच्या १० दहशतवाद्यांना कंट्रोल रुममधून सूचना देण्याचे काम लखवीने केले होते.
मुंबईला ६० तासांचा वेढा घालणाऱ्या लखवीला रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगातून मुक्त करण्यात आले. लाहोर उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याची शिक्षा रद्द करून त्याला तात्काळ सोडण्याचा आदेश दिला होता. लखवीच्या विधि पथकातील एका सदस्याने न्यायालयाचा आदेश तुरुंगापर्यंत पोहोचवला. त्यानंतर दुपारी १.४० वाजता लखवीला सोडण्यात आले.
भारताने लखवीच्या मुक्ततेला जोरदार आक्षेप घेतला असून, पाकिस्तानने दहशतवादाचा बीमोड करण्याचे दिलेले आश्वासन मोडले आहे, असा आरोप भारताने केला आहे. ५५ वर्षांचा लखवी तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी जमात उद दवाचे समर्थक तुरुंगाबाहेर जमले होते. समर्थकांच्या चार ते पाच कार अदियाला तुरुंगाबाहेर दुपारी १ च्या आसपास उभ्या होत्या. लखवी तुरुंगातून बाहेर आला, एका कारमध्ये बसला व इस्लामाबाद येथील आपल्या घराकडे निघून गेला.
लखवीचा वकील राजा रिझवान अब्बासी याने दिलेल्या माहितीनुसार पाक सरकारला लखवीला सोडण्याखेरीज अन्य पर्याय राहिला नव्हता. (वृत्तसंस्था)

Web Title: Lakhvi resigns from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.