Coronavirus: चिंताजनक! कोरोनामुक्त झाल्यानंतर २ आठवडे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; लँसेटचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 07:57 AM2021-08-04T07:57:13+5:302021-08-04T07:57:49+5:30

Coronavirus: जागतिक पातळीवर अद्यापही कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

lancet study claimed risk of heart attack and stroke is increased in first two weeks after corona cured | Coronavirus: चिंताजनक! कोरोनामुक्त झाल्यानंतर २ आठवडे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; लँसेटचा दावा

Coronavirus: चिंताजनक! कोरोनामुक्त झाल्यानंतर २ आठवडे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; लँसेटचा दावा

Next

लंडन: जागतिक पातळीवर अद्यापही कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतासह काही देशांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यातच आता कोरोनामुक्त झाल्यानंतर पुढील दोन आठवडे हार्ट अटॅकचा धोका सर्वांत जास्त असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. (lancet study claimed risk of heart attack and stroke is increased in first two weeks after corona cured)

लंडन येथील सुप्रसिद्ध जर्नल द लँसेट यांनी केलेल्या एका संशोधनातून सदर बाब समोर आली आहे. लँसेटच्या अभ्यासानुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिले दोन आठवडे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक यांचा धोका तीन पटीने वाढतो. लँसेटने स्वीडन येथे लाखो नागरिकांवर केलेल्या संशोधनातून सदर बाब समोर आल्याचे म्हटले गेले आहे. 

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका तिपटीने अधिक

स्वीडन येथे गतवर्षीच्या १ फेब्रुवारी ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत ८६ हजार ७४२ कोरोना रुग्ण आणि ३ लाख ४८ हजार ४८१ सामान्य नागरिकांवर यासंदर्भातील संशोधन करण्यात आले. येथील उमिया विद्यापीठातील अभ्यासकर्ते ओस्वाल्डो फोन्सेका रॉड्रिगेज यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका तीन पटीने वाढल्याचे दिसून आले. कोरोनामुक्त झालेल्यांचे वय, लिंग आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर ही बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, भारतात बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शांत झाली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रात आजही देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला २० हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यात संक्रमण वाढत असल्याने विजयन सरकारवर अनेक स्तरातून टीका होत आहे. वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप यांनी संक्रमणासाठी राज्यावर टीका करणे योग्य नाही असे म्हटले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने राज्याला जबाबदार धरणे योग्य नाही. परंतु राज्यात कमी लसीकरण दर, लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, निर्बंधांमध्ये सूट या गोष्टी संक्रमण वाढीसाठी प्रमुख कारण असू शकतात. आता लोकांना सतर्क राहणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: lancet study claimed risk of heart attack and stroke is increased in first two weeks after corona cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.