महिलेने इलेक्ट्रिशिअनला काम करण्यासाठी दिली घराची चावी, CCTV फुटेज पाहून बसला धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:59 PM2022-09-20T14:59:14+5:302022-09-20T14:59:44+5:30
महिलेने सांगितलं की, जेव्हा घराचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा तिच्या अनुपस्थितीत इलेक्ट्रिशिअन महिलेला घरात आणत होता.
ब्रिटनला राहणाऱ्या एका महिलेने नुकताच तिच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. जे बघून तिला चांगलाच धक्का बसला. झालं असं होतं की, या महिलेने एका इलेक्ट्रिशिअनला घरातील काम करण्यासाठी हायर केलं होतं. पण तिला दिसलं की, इलेक्ट्रिशिअन महिला घरात नसताना दुसऱ्या महिलेला घरात आणत होता. ही महिला घराच्या मागच्या दाराने एन्ट्री घेत होती.
Mumsnet वेबसाइटवर आयवी प्लांट नावाच्या यूजरने तिचा हा अनुभव सांगितला. महिलेने सांगितलं की, जेव्हा घराचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा तिच्या अनुपस्थितीत इलेक्ट्रिशिअन महिलेला घरात आणत होता.
आयवीनुसार, इलेक्ट्रिशिअनने घरातील काम करण्यासाठी 8 दिवस लावले होते. आतापर्यंत त्याने केवळ अर्धच काम केलं आहे. पण आयवीला असा प्रश्न पडला आहे की, तिने अनोळखी महिलेला घरात आणण्यावरून इलेक्ट्रिशिअनकडे तक्रार करावी की नाही.
सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, महिला घराच्या मागच्या दरवाज्यातून आत येत होती. हीच घटना दुसऱ्या दिवशीही घडली. आयवीनुसार, तिला हे चांगलंच माहीत आहे की, हा इलेक्ट्रिशिअन एकटाच काम करतो.
आयवीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, आता तिला या व्यक्तीकडून घरातील काम करून घेण्यास तिला फार असहज वाटत आहे. आता ती हा विचार करत आहे की, या व्यक्तीकडून चावी परत मागावी आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घ्यावं.
आयवीने लिहिलं की, इलेक्ट्रिशिअन सकाळी 8 वाजता येऊन 3 वाजता आपलं काम संपवतो. पण या सात तासांपैकी 4 तास तो या घरात आणलेल्या महिलेसोबत राहतो. आयवीने या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंटही चेक केले. त्यानुसार घरात आलेली महिला त्याची पत्नीही नाहीये. या वेबसाइटवर अनेक यूजर्सनी आयवीच्या पोस्टवर चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांनी या उदाहरणावरून घरमालकांनी किती सतर्क रहावं हे सांगितलं.