अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने सीरियावर डागली 100हून अधिक क्षेपणास्त्रं, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'मोहीम फत्ते'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 10:16 PM2018-04-14T22:16:29+5:302018-04-14T22:16:29+5:30
आपल्या नागरिकांवर केलेल्या कथित रासानिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर 'कामगिरी फत्ते झाली', अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
पॅरिस/ वॉशिंग्टन - आपल्या नागरिकांवर केलेल्या कथित रासानिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर 'कामगिरी फत्ते झाली', अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. सीरियावर केलेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स आणि ब्रिटनचे आभार मानले आहेत.
या कारवाईत सीरियाच्या रासायनिक शस्त्रांचा मोठा साठा उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा फ्रान्सने केला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे रशिया आणि इराण हे देश अस्वस्थ झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. सीरियाविरुद्ध करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत आक्रमक असून यामुळे सीरियातील नागरिकांवरील संकट वाढणार असल्याची भीती पुतीन यांनी व्यक्त केली आहे.
A perfectly executed strike last night. Thank you to France and the United Kingdom for their wisdom and the power of their fine Military. Could not have had a better result. Mission Accomplished!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 14, 2018
तर दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर केलेला हल्ला हा गुन्हा असून याद्वारे काहीही लाभ होणार नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या देशांनी अशाच कृत्यांचा इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानाविरोधात अशा कारवाया केल्याचे सांगत तेव्हाही या देशांना काहीच फायदा झालेला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
(सीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला?)
सीरियावर केमिकल हल्ला केल्यानंतर आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. सीएनएनच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात B-1 बॉम्बर्स, टोरनॅडो जेट्सचा वापर करण्यात आला.