अमेरिकेत आहे सर्वात मोठे हिंदू मंदिर, भारतातून पाठवली होती 13,499 दगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 06:52 PM2018-07-24T18:52:02+5:302018-07-24T18:54:57+5:30
भारत हा हिंदूचा सर्वात मोठा देश मानला जातो, पण अमेरिकेमध्ये जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्मीतीसाठी भारतातून 13,499 दगडे पाठवण्यात आली होती.
नवी दिल्ली - भारत हा हिंदूचा सर्वात मोठा देश मानला जातो, पण अमेरिकेमध्ये जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. अमेरिकेतील न्यूजर्जीमधील रॉबिंसविले या ठिकाणी हे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्मीतीसाठी भारतातून 13,499 दगडे पाठवण्यात आली होती. हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचे असून याची निर्मीती बोचासनवासी अक्षर पुरषोत्तम स्वामीनारायण संस्थेने केली आहे. हे भारताबाहेरील सर्वात मोठे मंदिर मानले जातेय. 162 एकरमध्ये मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये प्राचिन भारताची झलक दिसून येते.
स्वामीनारायण मंदिरासाठी 68 हजार क्युबिक फूट इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला तसेच 108 खांब आहेत. या मंदिरामध्ये तीन गुहा आहेत.
हे मंदिर शिल्पशास्त्रानुसार बनवण्यात आले आहे. मंदिर उभारणीला तब्बल 108 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.