१९ नोव्हेंबरला शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण; भारतात चंद्राचा रंग दिसणार लालभडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:44 AM2021-11-08T08:44:42+5:302021-11-08T08:44:58+5:30
२००१ ते २०२१ या काळात प्रथमच अशा प्रकारची घटना होत आहे.
वॉशिंग्टन : शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार असून यावेळी चंद्राचा रंग लालभडक असेल. यापूर्वी २६ मे रोजी चंद्रग्रहण होते. नासाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या शतकातील सर्वात दीर्घ काळ चालणारे चंद्रग्रहण ३ तास २८ मिनिट आणि २३ सेकंदांचे असेल.
२००१ ते २०२१ या काळात प्रथमच अशा प्रकारची घटना होत आहे. आसाम, अरुणाचल प्रदेशमधील लोक ही खगोलीय घटना पाहू शकतील. उत्तर अमेरिकेतील लोकही याचा आनंद घेऊ शकतील. मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया आणि उत्तर युरोपातही चंद्रग्रहण दिसेल.