बाळाला स्तनपान देत लॅरीसा यांचं संसदेत भाषण

By admin | Published: June 23, 2017 10:15 AM2017-06-23T10:15:41+5:302017-06-23T10:15:41+5:30

संसदेमध्ये लॅरीसा वॉटर्स यांनी संसद सुरू असताना आपल्या बाळाला स्तनपान दिलं.

Larry's speech in the Parliament of breastfeeding for the baby | बाळाला स्तनपान देत लॅरीसा यांचं संसदेत भाषण

बाळाला स्तनपान देत लॅरीसा यांचं संसदेत भाषण

Next

ऑनलाइन लोकमत

कॅनबेरा, दि. 23-  संसद म्हंटलं की देशभरातील महत्त्वाचे विषय, त्या विषयावरच्या चर्चा आणि या चर्चेतून निर्माण होणारे वाद, असं चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. महिलांना संसदेमध्ये ठराविक जागा आता आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार संसदेत आपल्याला महिलांची उपस्थिती दिसते. तसंच प्रत्येत क्षेत्रामध्ये महिला आपलं स्थान बळकट करत आहेत. ही गोष्ट जरी खरी असली तरही महिलांच्या बाबतीत अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांना कराव्याच लागतात. ज्याची टाळाटाळ करता येत नाही. अनेकदा तर धाडसी पाऊलं उचलत महिला आपली प्रत्येक भूमिका चोखपणे निभावून नेतात. 
 
महिलेच्या याच गुणांचा प्रत्यय नुकताच कॅनबेरा इथल्या संसदेत आला. संसदेमध्ये लॅरीसा वॉटर्स यांनी संसद सुरू असताना आपल्या बाळाला स्तनपान दिलं. संसद सुरू असताना अशा प्रकारची कृती करत लॅरीसा यांनी इतिहास रचला आहे.  अशाप्रकारचं धाडस करणारी ही देशातील पहिली महिला ठरली होती. संसदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा होत असते. अनेक महत्त्वाचे निर्णय याठिकाणी घेतले जातात. यावेळी आपण हजर असणं गरजेचं आहे, पण आपल्या बाळाकडेही दुर्लक्ष व्हायला नको या हेतून त्यांनी न लाजता भर संसदेत ही गोष्ट केली.
 
ब्लॅक लंग डिसिज या आजाराबाबत लोकसभेत ठराव मंजूर करताना त्यांनी आपल्या बाळाला स्तनपान दिलं. बाळाला स्तनपान न दिल्यास होणाऱ्या या आजाराचं महत्त्व सांगत त्यांनी प्रत्यक्ष कृती करुन दाखवली आहे. आपल्या १४ आठवड्यांच्या अलिया जॉय नावाच्या बाळाला लॅरीसाने भर संसदेत दिलेल्या स्तनपानाचं संसदेत आणि देशातून खूप कौतुक झालं आहे. 
माझं बाळ संसदेत स्तनपान घेणारं पहिलं बाळ ठरल्यानं मला त्याचा अभिमान आहे, असं लॅरीस यांनी यावेळी सांगितलं. तसंच याठिकाणचं वातावरणही लवचिक आणि फॅमिली फ्रेंडली असावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. याआधी अशाप्रकारे बाळांना संसदेत आणण्याची परवानगी नव्हती. मात्र आता ती देण्यात आल्याने महिलांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी हे अतिशय सोयीचं झालं असल्याचं लॅरीसा म्हणाल्या आहेत. 
 

Web Title: Larry's speech in the Parliament of breastfeeding for the baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.