लास वेगास हल्ला : हल्लेखोराच्या मैत्रिणीलाही नव्हती नरसंहाराची कल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:36 AM2017-10-06T04:36:43+5:302017-10-06T04:39:02+5:30
येथे आयोजित एका संगीत कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार करत ५९ जणांचे बळी घेणा-या हल्लेखोर स्टीफन पॅडॉक याची मैत्रीण मॅरिलो डॅन्ले (६२) हिने स्पष्ट केले आहे की..
लास वेगास : येथे आयोजित एका संगीत कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार करत ५९ जणांचे बळी घेणा-या हल्लेखोर स्टीफन पॅडॉक याची मैत्रीण मॅरिलो डॅन्ले (६२) हिने स्पष्ट केले आहे की, या नरसंहाराबाबत आपल्याला काहीही कल्पना नव्हती. तर, पॅडॉक हा शांत आणि दुसºयांची काळजी घेणारा होता, असेही तिचे मत आहे.
गोळीबार झाल्यानंतर स्टिफनची मैत्रीण मॅरिलो डॅन्ले चर्चेत आली होती. ती म्हणाली की, स्टीफनसोबत मी एक शांत आयुष्य जगू इच्छित होते. मॅरिलो डॅन्ले मंगळवारी रात्री फिलिपीनहून अमेरिकेला दाखल झाली. या वेळी एफबीआयच्या अधिका-यांनी तिची कसून चौकशी केली. स्टीफन पॅडॉक असे काही करणार आहे, याची आपणास अजिबातच पूर्वकल्पना नव्हती, असे तिने सांगितले. ती म्हणाली की, स्टीफनला एक दयाळू, दुस-यांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून मी ओळखत होते. मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि त्याच्यासोबत शांत आयुष्य जगू इच्छित होते. त्याने मला कधी असे काही बोलून दाखवले नाही की ज्यातून मला काही संशय यावा वा त्याच्या या स्वभावाचा अंदाज यावा.
भविष्यात असे काही होईल, असे मला कधीही वाटले नव्हते. मी फिलिपिनमध्ये असताना घर खरेदीसाठी त्याने काही रक्कमही पाठविली होती. त्या वेळी स्टीफन पॅडॉक माझ्यासोबतचे नाते संपवू पाहत आहे, अशी शंका मला आली, असेही तिने सांगितले. मॅरिलो डॅन्ले ही आॅस्ट्रेलियन नागरिक आहे. कामाच्या निमित्ताने ती २० वर्षांपूर्वी ती अमेरिकेत आली होती.