चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवणारे अंतराळवीर काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 06:41 PM2017-01-17T18:41:13+5:302017-01-17T19:13:37+5:30
चंद्रमोहिमेतील शेवटची मोहिम असलेल्या अपोलो १७ यानाचे कमांडर युजेन सेरनन यांच्याकडे चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर असल्याचा मान आहे.
ऑनलाइन लोकमत
ह्यूस्टन, दि. 17 - चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणारे नील आर्मस्टाँग यांचे नाव सर्वांनाच माहिती आहे. मात्र, चंद्रावर शेवटचे पाऊल कुणाचे होते याची माहिती लोकांना फारशी नाही. चंद्रमोहिमेतील शेवटची मोहिम असलेल्या अपोलो 17 यानाचे कमांडर युजेन सेरनन यांच्याकडे चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर असल्याचा मान आहे. कमांडर युजेन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले . ह्यूस्टनच्या एका रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे निधन झाले तेव्हा सर्व नातेवाईक उपस्थित होते.
नासाने आपल्या ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. सरनेन यांच्या कुटूंबाची प्रवक्ता मेलिसा रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माजी अंतराळवीर युजेन सेरनन काही दिवसांपासून आजारी होते.
युजेन सेरनन अपोलो 17 या याने कमांडर होते, त्यांनी 14 डिसेंबर 1972 रोजी चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर जाणारे ते शेवटचे पृथ्वीवासी होते. तिसऱ्या अंतराळ यात्रेवेळी त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. अपोलो 17 नंतरही तीन चांद्रमोहिमा आखल्या गेल्या होत्या पण पैशांअभावी त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत.
Gene Cernan, the last man to walk on the moon, passed away today. We reflect on his life and legacy: https://t.co/U0HrTZo0iXpic.twitter.com/JtgCCQImrM
— NASA (@NASA) 17 January 2017
The family of Apollo astronaut Capt. Eugene Cernan, the last man to walk on the moon, addresses his passing: https://t.co/d6WqT3uaePpic.twitter.com/KXlQopgAya
— NASA (@NASA) 16 January 2017