झिंदाबाद... झिंदाबाद, १२ सेकंद घोषणा, एका झटक्यात ४० हून अधिक जणांचा मृ्त्यू ; PAK स्फोटाचा भयानक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:09 AM2023-07-31T08:09:16+5:302023-07-31T08:31:34+5:30

या व्हिडिओमध्ये १२ सेकंद झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू होते, मात्र त्यानंतर लगेचच मोठा स्फोट होतो आणि आरडाओरडा सुरू होते.

latest news pakistan blast video death count injure terrorist attack detai | झिंदाबाद... झिंदाबाद, १२ सेकंद घोषणा, एका झटक्यात ४० हून अधिक जणांचा मृ्त्यू ; PAK स्फोटाचा भयानक व्हिडीओ

झिंदाबाद... झिंदाबाद, १२ सेकंद घोषणा, एका झटक्यात ४० हून अधिक जणांचा मृ्त्यू ; PAK स्फोटाचा भयानक व्हिडीओ

googlenewsNext

पाकिस्तानमध्ये रविवारी झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे एक मोठा बॉम्बस्फोट झाला, यामध्ये ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५० जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विध्वंसाचे दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

कारवायांचा कट उधळला, पाच दहशतवादी गजाआड

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही नेते व्यासपीठावर उभे राहून भाषण करत आहेत. यावेळी समर्थक जमाव झिंदाबाद-झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. व्हिडिओमध्ये १२ सेकंद झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू होते, मात्र त्यानंतर लगेचच मोठा स्फोट होतो आणि आरडाओरडा होतो. लोक इकडे तिकडे धावत आहेत. अनेकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. 

आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, पण हा हल्ला खैबर पख्तूनख्वामध्ये झाला असल्याने टीटीपीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा संपूर्ण भाग अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असल्याने अनेक वेळा पाकिस्तानी तालिबानकडून येथे मोठे आणि प्राणघातक हल्ले झाले आहेत. रविवारी हा बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना सोडले जाणार नाही, असे आश्वासनही सरकारने दिले आहे. याआधीही दहशतवाद्यांनी जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या कार्यक्रमांना लक्ष्य केले आहे. त्यानंतरही सुरक्षेत एवढी मोठी कुचराई झाली असेल, तर प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: latest news pakistan blast video death count injure terrorist attack detai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.