मोठा दिलासा! आता भारतीयांना सहज मिळणार अमेरिकेचं ग्रीन कार्ड, विधेयकाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 02:13 PM2019-07-11T14:13:40+5:302019-07-11T14:15:45+5:30
अमेरिकेच्या सिनेटनं ग्रीन कार्ड जारी करण्यासंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
वॉशिंग्टनः अमेरिकेच्या सिनेटनं ग्रीन कार्ड जारी करण्यासंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतातल्या हुशार आयटीयन्सना फायदा पोहोचणार आहे. अमेरिकेत स्थायिक होऊन नोकरी, धंदा करायचा असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते. अमेरिकेनं मंजूर केलेल्या या विधेयकामुळे प्रतिभावान आयटीयन्सना अमेरिकेत राहून काम करता येणार आहे. फेअरनेस ऑफ हाय स्कील इमिग्रेंट्स अॅक्ट 2019 किंवा एचआर 1044 नावाचं हे विधेयक 435 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये 365 मतांनी पारीत झालं आहे. तर या विधेयकाच्या विरोधात 65 मते पडली आहेत. प्रत्येक वर्षी सर्वात जास्त भारतीय हे H-1B आणि L व्हिसावर अमेरिकेला जातात. आकड्यांनुसार एप्रिल 2018पर्यंत अमेरिकेतल्या टेक्नोलॉजी क्षेत्रातील 3 लाख भारतीय असे आहेत की जे ग्रीन कार्डची वाट पाहतायत.
- काय आहे नवा कायदाः अमेरिकी सिनेटनं प्रत्येक वर्षी सर्वच देशातील 7 टक्के ग्रीन कार्ड जारी करण्याची सीमा संपवली आहे. आता सहजरीत्या अमेरिकेते ग्रीन कार्ड धारण केलेल्या लोकांना स्थायी स्वरूपात राहणं आणि काम करण्याची परवानगी मिळणार आहे. याचा हजारो आयटीयन्सला फायदा पोहोचणार आहे. बऱ्याच काळापासून जे लोक अमेरिकेत कायद्यानं राहू इच्छितात, त्यांचा आता दिलासा मिळणार आहे.